शब्दालंकार साहित्य मंडळतर्फे आॅनलाईन काव्य संमेलन उत्साहात

345

विदर्भ वतन / विरार : शब्दालंकार साहित्य मंडळ, विरार तर्फे नुकतेच आॅनलाईन काव्य संमेलन आयोजित करण्यात आले. हे संमेलन तीन भागांमध्ये विभागण्यात आले. जवळपास शंभर कवींनी आयोजकांना भेट दिली आणि अवघ्या चारच दिवसात ७० कविता सादर करण्यात आल्या. पहिल्या काव्य संमेलनात २४ कवी, दुसर्या संमेलनात २० तर तिसर्या संमेलनात ३० कवींनी आपल्या कविता सादर केल्या. प्रशांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पहिले काव्य संमेलन १८ जून रोजी आयोजित करण्यात आले होते. दुसरे २१ ला अनिल धारूळकर यांच्या अध्यक्षतेत तर नगरसेविका सुरेखा कुरकुरे तिसर्या कवी संमेलनाच्या अध्यक्षा होत्या.हे संमेलन २४ जून रोजी आयोजित करण्यात आले. या संमेलनाचे आयोजन शब्दालंकार साहित्य मंडळाच्या अध्यक्षा अ‍ॅड. नेहा धारूळकर आणि उपाध्यक्षा संगीता पाध्ये यांनी केले होते. सुचित्रा पितळे यांनी स्वागत गीत आणि पसायदार सादर केले. कवी निलेश हेम्बाडे, कवी निखिल नाईक आणि सुजाता कवळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.