पेट्रोल व डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

183

विदर्भ वतन / नागपूर : पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहे. याच्या निषेधार्थ दक्षिण नागपुरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव गिरीश पांडव यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. कच्च्या तेलाच्या किमती स्थिर असतानाही भारतात पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढत आहेत. यामुळे सामान्य जनता त्रस्त आहे. केंद्र सरकार वेगवेगळे कर लावून जनतेला वेठीस धरत असल्याचा आरोप गिरीश पांडव यांनी केला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रसचे प्रवक्ते अतुल लोंढे, महिला अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, ब्लॉक अध्यक्ष विश्वेश्वर अहिरकर, किशोर गीत, वीणाताई बेलगे, अरविंद क्षीरसागर, प्रकाश ठाकरे, प्रवीण सांधेकर, संगीता उपरिकर, विपुल गजभिये, पिंटू तिवारी, बबलू शेख, सुहास नानवटकर, राजेश रहाटे, सचिन मेंढुले, निलेश चंद्रिकापुरे, ज्योती ढोके, प्रशांत आस्कर, इम्रान पठाण, राजाभाऊ रहाटे, सागर नालमवार, प्रमिला धामणे, पूजा देशमुख, सरिता लक्षणे, रेखा काटोले यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.