Home Breaking News ‘एसओपी’चा वापर करून राज्यातील सलुन व्यवसाय अनलॉक करता येवू शकतात

‘एसओपी’चा वापर करून राज्यातील सलुन व्यवसाय अनलॉक करता येवू शकतात

0
‘एसओपी’चा वापर करून राज्यातील सलुन व्यवसाय अनलॉक करता येवू शकतात
कोविड-१९ मुळे केंद्र सरकारकडून देशभरात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले. चार टप्प्यांमध्ये लॉकडाऊनची प्रक्रिया पार पाडण्यात आली. अखेर अनलॉक ०.५ ची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊन ०.४ व अनलॉकडाऊन ०.५ मध्ये बºयाच प्रमाणात व्यवसाय आणि सामान्य व्यवहार सुरू करण्यात आले.
देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्यापासून आजपर्यंत सलुन व्यवसायीकांचे महाराष्ट्र राज्यातील दुकाने बंद आहेत. भारतातील बºयाच राज्यांनी प्रामुख्याने मध्यप्रदेश, तेलंगना, आंध्रप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, कर्नाटक, छत्तीसगढ या राज्यांनी आपआपल्या राज्यातील सलुन व्यवसाय पुर्ववत केलेले आहेत. ही बाब आपल्या राज्यासाठी प्रामुख्याने लक्षात घेण्यासारखी आहे. या राज्यांनी आपल्या राज्यात एसओपी (स्टॅडर्ड आॅपरेटींग प्रोसीजर) मध्ये नियमावली तयार करून त्यानुसार कायद्याचे अधिन राहून सलुन व्यवसयीकांचे दुकाने सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. एसओपी संबंधीत शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. याचे सज्ञान घेण्यात यावे.
महाराष्ट्रात मागील तीन महिन्यापासून नाभिक, सलुन व्यवसयीक दुकाने बंद असल्यामुळे आत्महत्याचे सत्र सुरू झालेले आहे. स्वाभिमानाने जगणारा समाज शासनाच्या धोरणामुळे हतबल झालेला असल्याचे दिसुन येत आहे. सलुन व्यावसायीकांनी वेळोवेळी शासनास आपली स्थिती प्रगट करण्यासाठी निवेदने दिलेली असल्याचेही दिसुन येत आहे. यावर वेळोवेळी बºयाच नेतेमंडळीने आपली वैयक्तीक व्यथा, सहानुभुती देखील कळविली.
नाभिक एकता मंचतर्फे नागपुरातील जिल्हा परिषद येथील खेडकर सभागृहात दिनांक २० रोजी मंत्री सुनील केदार यांचेशी चर्चा झाली. यावेळी आपण हा विषय मंत्रीमंडळ बैठकीत चर्चेत आवर्जुन उपस्थित करू असा सकारात्मक संदेश त्यांनी उपस्थितांना दिला. नाभिक सलुन व्यवसायीकांच्या कुटुंबाचे व्यवसाय बंद असल्याने त्यांचेवर हलाखीचे दिवस आले आहेत. शासनाने इतर राज्यातील एसओपीचा वापर करून सलुन व्यवसायीक दुकाने त्वरीत चालु करणे अतीतातडीचे ठरते.
तसेच परिस्थीतीची जाण ठेवून राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेसोबत चर्चा केली. मुख्यमंत्री याबाबत सकारात्मक निर्णय घेत असल्याच्या विचारात असून येत्या १ जुलैपासून सलून, पार्लर दुकाने सुरू करू देण्यास परवानगी देण्यात येईल असे सुतोवाच मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती ना. वडेट्टीवार यांनी माध्यमांना दिली.  कोरोनाच्या पार्श्चभूीवर राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर मागील तीन महिन्यांपासून राज्यातील सलून आणि पार्लर बंद आहेत. राज्यात १ जूनपासून लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आली आहे. मात्र, सलून आणि पार्लर सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारने अद्याप दिली नव्हती. सोशल डिस्टंन्सिगसोबत कारागिरांनी ग्राहकांची पुरेशी काळजी घेणार असतील तर सुरू करण्यास हरकत नसावी, मात्र, कोरोनासंबंधी सर्व काळजी घेऊन आचारसंहिता वा नियमावली तयार करून राज्यात सर्वत्र सलून, पार्लर पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात येईल. येत्या आठवड्याभरात याबाबत सरकार निर्णय घेईल, असे सांगतानाच १ जुलैपासून राज्यभरातील सलून आणि पार्लर सुरू करणार असल्याचे संकेत ना. वडेट्टीवार यांनी दिले.
सलुन व्यवसायीकाचा व्यवसाय हा त्यांच्या उपजीवीकेचे साधन आहे व कोरोना आपदामध्ये ‘संक्रमीत’ या संज्ञेमध्ये तपासून घ्यायला पाहिजे व त्यास प्राधान्यक्रमाने सोडविणे हे पुरोगामी राज्याचे कर्तव्यच आहे. आपल्या माहितीस्तव इतर राज्यात वापरण्यात येणारी एसओपी नियमावली तसेच त्यामधील काही प्रमुख बाबींचा येथे आपल्या माहितीसाठी उल्लेख करण्यात आलेला आहे. आपण त्याबद्दल सविस्तर माहिती संबंधीत शासन वेबसाईटवर असुन त्याचे अवलोकन करू शकता तसेच त्याचा अंर्तभुत करून आपले शासन त्यास महाराष्ट्रात लागु करण्यास हरकत नसावी.
एसओपी नियमावली भारतातील इतर राज्याने कमी जास्त अटीसह लागू करून सलुन व्यवसायीक दुकाने सुरू केलेली आहे. याची आपण नोंद घेवून सदर नियमावलीमध्ये आपले स्तरावर सुधारणा करून आपल्याला महाराष्ट्रातदेखील सलुन दुकाने सुरू करण्यास हरकत नसावी.
अ‍ॅड. गिरीश दादीलवार
संघटन सचिव,
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस विधी विभाग,
कायदेशीर सल्लागार- नाभिक एकता मंच,
मुख्य संयोजक-राष्ट्रीय परंपरागत बलुतेदार कारागिर महासंघ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here