सलग सहाव्या दिवशीही नवा बाधित रुग्ण नाही

319

१३९अहवालांची प्रतीक्षा, २६९५ व्यक्ती विलगीकरणात

 राधाकिसन चुटे, जिल्हा प्रतिनिधी
विदर्भ वतन / गोंदिया: जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात यश आले आहे. सलग सहा दिवसांपासून नवा कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे.अद्यापही १३९ अहवाल प्रयोगशाळेत प्रलंबित आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १०२ कोरोना बाधित रुग्ण आढळले. ७२ रुग्ण हे उपचारातून कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. जिल्ह्यात आता क्रियाशील कोरोना रुग्णांची संख्या ३० इतकी आहे. जिल्ह्यात आढळलेले १०२ कोरोना बाधित रुग्ण हे अर्जुनी मोरगाव तालुका ३१,सडक अर्जुर्नी तालुका १०, गोरेगाव तालुका ४, आमगाव तालुका १, सालेकसा तालुका २, गोंदिया तालुका २२ आणि तिरोडा तालुक्यातील ३२ रुग्ण आहे.
गोंदिया येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत कोरोना संशयित २०१४ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले.त्यामध्ये १०२ रुग्ण हे कोरोना बाधित आढळुन आले. १३९ नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेत प्रलंबित आहे. ७१ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहे. विविध शाळा व संस्थांमध्ये ७७२ आणि घरी १९२३ अशा एकूण २६९५ व्यक्ती विलगीकरणात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे यांनी दिली.