स्वच्छता कर्मचार्यांना स्थायी करा

270

इंटकचे अति. आयुक्तांना निवेदन

विदर्भ वतन / नागपूर : प्रलंबीत पात्र असलेले ऐवजदार सफाई कामगारांना स्थायी स्वरूपात घेण्यासंदर्भात मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉ. प्रदिप दासरवार यांना राष्ट्रीय सफाई मजदूर कॉंग्रेसतर्फे निवेदन देण्यात आले. अस्थाई सफाई कामगारांना कायम स्वरूपात नोकरीवर घेतले जात नसल्याने उद्भवत असलेल्या समस्यांकडे संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत भगत यांनी लक्ष वेधले. यावेळी शत्रुघ्न महतो, जिल्हा अध्यक्ष दिलीप खैरवार, शहर महासचिव विजय मधुमटके, जिल्हा महासचिव संतोष मकरंदे, शहर कार्याध्यक्ष कृष्णा तांबे, आशु गायकवाड़ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. निवेदनावरून लवकरच गांभीर्याने विचार करण्यात येईल आणि यासंबंधी अडकलेला आदेश काढण्यात येईल शिवाय कोणावरही अन्याय होवू देणार नाही असे अति. आयुक्त जोशी शिष्टमंडळाला म्हणाले.