Home Breaking News संत तुकाराम महाराजांच्या अपमानाचा राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीकडून निषेध

संत तुकाराम महाराजांच्या अपमानाचा राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीकडून निषेध

199 views
0

नगरसेवक ग्वालबंशी यांनी केले संत परेपरेला कलंकीत

विदर्भ वतन / नागपूर : महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील संत शिरोमणी तुकाराम महाराज हे कुणबी समाजाचे आद्य दैवत आहेत. नगरसेवक हरिष ग्वालबंशी यांनी आपल्या खालच्या पातळीवरच्या राजकारणाचा परिचय देत ‘ते एक संत झाले आणि त्यांनी … असा व्यवहार केला’ असे सभागृहात क्लेषजनक वक्तव्य करून महाराष्ट्रातील संत परंपरेला कलंकीत केले, या घटनेचा राष्ट्रीय जनसुराज्य पक्षातर्फे निषेध करून ग्वालबंशी यांना आपली राजकीय परिपक्वता दाखविण्याचा सल्ला दिला.
अशा वक्तव्यामुळे कुणबी समाजाचे मन दुखावल्या गेले आहे. या अनुचित प्रकाराची ग्वालबंशी यांनी जाहिर माफी मागावी या आशयाचे पत्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, महापौर संदीप जोशी, आयुक्त तुकाराम मुंढे यांना जिल्हाधिकार्यामार्फत पाठविले आहे. या घटनेविरोधात पार्टीतर्फे निषेध आंदोलन केले जाईल असे सुतोवाच पाटर्ी्रचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश काकडे यांनी प्रसार माध्यमांना दिले आहेत. पार्टीचे राष्ट्रीय महासचिव चंद्रभान रामटेके, सदस्य शंकर बर्मन, अजय शर्मा, जैनउल्हा शहा, विदर्भ विभागीय अध्यक्ष तारेश दुरूगकर, विदर्भ महिला अध्यक्ष अमिता भिवगडे, दिनेश रॉय, रोशन शाहु, प्रविण डंभारे, शिव राऊत, जनाब फरीद कुरेशी, सुभाष मलपद्देवार, विदर्भ विभागीय प्रमुख घनश्याम पुरोहीत, वैभव मेश्राम, आयुष खोब्रागडे, किरण यादव, दिपक झाडे, लिलाधर पालीवाल, अनुराग शेंडे, रजत दुरूगकर, सुरेश चव्हाण, विनोद खरे यांनी निषेध नोंदविला असल्याचे पार्टीचे प्रसिध्दी प्रमुख शिव राऊत यांनी प्रसार माध्यमांना सांगीतले.