Home Breaking News सफाई कामगारांकडून हमालीचे सत्र सुरूच !

सफाई कामगारांकडून हमालीचे सत्र सुरूच !

0
सफाई कामगारांकडून हमालीचे सत्र सुरूच !

मेडिकलमध्ये सफाई कामगारांच्या हिताची पायमल्ली

प्रशासनाच्या मुजोरीला आळा घालेल तरी कोण?

विदर्भ वतन / नागपूर : गत आठवड्यात सा. विदर्भ वतनमध्ये ‘मेडिकलमध्ये सफाई कर्मचार्यांकडून केली जाताहेत हमालीची कामे’ या मथळ्याअंतर्गत मेडिकलमधील सफाई कामगारांच्या व्यथा मांडणारी बातमी प्रकाशित करण्यात आली होती. पण या कामगारांकडून सातत्याने हमालीची कामे करून घेण्याचे सत्र अद्यापही थांबलेले आहे. मेडिकल प्रशासनांतर्गत अधिष्ठाता कार्यालयात जवळपास ४४ सफाई कर्मचारी कार्यरत आहेत तर अन्य विविध कामांसाठी २० कर्मचारी नियुक्त आहेत या विस पैकी ३ कर्मचारी फक्त हमाली कामासाठी नियुक्त केलेली आहेत मात्र, अद्यापर्यंत त्यांना कुठलीच हमालीची कामे देण्यात आलेली नसल्याने त्यांच्या कर्तव्यात येत असलेली हमालीची कामे सफाई कागारांना आपल्या कामांव्यतिरिक्त दबाव टाकून करवून घेतली जात असल्याने या कामगारांमध्ये रोष निर्माण झाला आहे. असाच प्रकार शनिवारी पुन्हा उघडकीस आला आहे. मेडिकल उपयोगी वस्तूंच्या भरलेल्या अख्ख्या ट्रकमधील खोके नियुक्त हमालांना न बोलाविता सफाई कामगारांकडून खाली करवून घेण्यात आले.
मेडिकल प्रशासनाची धुरा सांभाळणार्या अधिष्ठात्यांना या गोष्टीची कल्पना प्रशासकीय अधिकारी देत नसल्यामुळे सफाई कामगारांवर सातत्याने अन्याय होत आलेला आहे. नियुक्तीनुसार ठरवून दिलेल्या कामांव्यतिरिक्त इतर कामे करण्यास नकार दिल्यास नोकरीवरून काढून देण्याची किंवा रेकॉर्ड खराब करण्याची धमकी दिली जात नसल्याने मन मुठीत धरून प्रशासन सांगेल ती कामे करवीच लागत असल्याचे येथील सफाई कामगारांनी सांगीतले. लाडपागे समितीअंतर्गत येथे या श्रेणीतील अन्य कामगारांच्या नियुक्तीसाठी भरती करण्यात आली होती पण त्यातील अर्ध्याच कामगारांना कामावर रूजू करण्यात आले आणि अन्य कामगरांना आपल्या वैयक्तीक लाभाच्या सोयीनुसार भरती करण्याचे धोरण आखले जात असल्याचे समोर आले आहे. या धोरणाविरोधात मेडिकलच्या प्रशासनातील विश्वसनियतेची प्रतिमा ढासळत चालली आहे. अशा प्रकारामुळे सातत्याने प्रशासनात कार्यरत असलेल्या अधिकर्याकडून विद्यमान अधिष्ठात्यांविरोधात वातावरण निर्माण केल्या जात असल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here