Home Breaking News पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम त्वरित देण्यात यावी

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम त्वरित देण्यात यावी

77 views
0

शिवसेना नगरसेवकांची केंद्र शासनाला मागणी

विदर्भ वतन / अर्जुनी मोर : स्थानीय नगर पंचायत क्षेत्रामध्ये पंतप्रधान आवास योजने अंतर्गत एकूण ३२३ गरजू लोकांना घरकुल मंजूर झाले. राज्य आणि केंद्र शासनाकडून घरकुल उभारण्यासाठी दोन लाख पन्नास हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी दिल्या जातो. त्यामध्ये राज्य शासनाने घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये निर्धारित रक्कम एक लाख रुपये जमा केली आहे.
ही रक्कम प्राप्त होताच लोकांनी आपल्या घरचे कामे सुरू केले आणि स्वत:च्या घराचे बांधकाम पुर्ण होईपर्यंत भाड्याच्या खोलीत वास्तव्य सुरू केले. ज्यांना भाड्याने राहणे परवडत नव्हते त्यांनी झोपडीचा आसरा घेतला. कुणी पायवा उभारण्यासाठी गड्डे खोदून ठेवले तर कुणी संपूर्ण मोडके घर पडून भिंती उभ्या करून ठेवल्यात, तर कुणाचे हात उसने घेऊन अख्या घराचे काम पूर्ण केले पण केंद्र शासनाचा एक रुपयासुद्धा खात्यात जमा न झाल्याने लाभार्थी हवालदिल झाला आहे. संचारबंदी मुळे कुणालाही व्यवसाय करता आला नाही सर्व काम धंदे बंद झालेत, कुणी उधारी सुद्धा द्यायला तयार नाही. पावसाच्या आगमनाने शेतीचे कामे सुरू झालीत, आता पैसा शेतीमध्ये लावायचा की घर उभ करायचे? हा सर्वात मोठा प्रश्न नगरातील घरकुल लाभार्थ्यांसमोर आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून घरकुल लाभार्थ्यांचा उर्वरित निधी त्वरित खात्यात जमा व्हावा याकरीता शिवसेना नगरसेवक प्रकाश दिलीप उईके, नगरसेविका ममता संजयसिह पवार यांनी खासदार सुनील मेंढे यांना पत्रव्यवहार केले.