Home Breaking News एक रुग्ण कोरोनामुक्त, जिल्ह्यात चार दिवसांपासून नवा रुग्ण नाही 

एक रुग्ण कोरोनामुक्त, जिल्ह्यात चार दिवसांपासून नवा रुग्ण नाही 

70 views
0

आता ३२ क्रियाशील रुग्ण

राधाकिसन चुटे, जिल्हा प्रतिनिधी
विदर्भ वतन / गोंदिया (जिमाका) : जिल्ह्यात सलग चार दिवसांपासून नवा कोरोना संसर्ग झालेला रुग्ण आढळून आलेला नाही. दिनांक २१ जून रोजी एक कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता क्रियाशील कोरोना रुग्ण ३२ आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १०२ कोरोना बाधित रुग्ण आढळले. ७० रुग्ण उपचारातून कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. जिल्ह्यात आता ३२ क्रियाशील रुग्ण आहेत. आता जो रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे तो तिरोडा तालुक्यातील आहे.
१०२ कोरोना बाधित रुग्ण हे अर्जुनी मोरगाव तालुका ३१, सडक अर्जुनी तालुका १०, गोरेगाव तालुका ४, आमगाव तालुका १, सालेकसा तालुका २, गोंदिया तालुका २२ आणि तिरोडा तालुक्यातील ३२ रुग्ण आहे. गोंदियाच्या प्रयोगशाळेत  १८१४ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने पाठविण्यात आले. १०२ रुग्ण हे कोरोना बाधित आढळुन आले. ८५ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. ७० रुग्ण हे कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यातील विविध शाळा व संस्थांमध्ये ८९९ आणि घरी १८१४ अशा एकूण २८५८ व्यक्ती विलगीकरणात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी दिली.