धान उत्पादक शेतकर्यांसाठी १६० कोटी बोनस निधी प्राप्त

247

गोंदियाला १३४.७६ तर भंडारा जिल्हयाला ४२.८९ कोटी निधी

खा. पटेल यांच्या प्रयत्नाला यश

राधाकिसन चुटे, जिल्हा प्रतिनिधी 
विदर्भ वतन / गोंदिया – भंडारा:  राज्य शासनाने धान उत्पादक शेतकर्यांसाठी पाचशे रुपये बोनस जाहिर केले होते. परंतु गेल्या हिवाळी अधिवेशानात खासदार प्रफुभाई पटेल यांच्या निवेदनावर राज्य शासनाने २०० रुपये बोनस वाढवण्याची घोषणा केली. अशा प्रकारे धान उत्पादक शेतकरर्यासाठी ७०० रुपये प्रति क्विंटल बोनस जाहिर झाला. शासनाने जाहिर केलेले बोनस, खरीप हंगाम २०१९-२० साठी यापूर्वी मिळालेली निधी शेतकर्याच्या खात्यात वळती करण्यात आलेला आहे. त्यानंतर सुध्दा गोंदिया व भंडारा जिल्हयातील शेतकर्याची बोनसची निधी  शासनाकडे प्रलंबित आहे. खासदार प्रफुल पटेल यांनी पुन्हा राज्य शासनासोबत पत्र व्यवहार केला व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेशी शेतकर्यांचे प्रलंबित बोनस तातडीने देण्यासंबंधी चर्चा केली. त्या अनुशंगाने महाराष्ट्रराज्य मार्केटिंग फेडरेशन, मुंबई कडून दिनांक १७. जून २०२० रोजी गोंदिया जिल्हयातील शेतकर्यांना बोनस देण्यासाठी गोंदिया जिल्हा मार्केटिंग अधिकारी गोंदियाकडे ५६.३४ कोटी व भंडारा जिल्हा मार्केटिंग अधिकारी कडे १०३.६५ कोटीची रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे.
आता ज्या धान उत्पादक शेतकर्याना बोनसची रक्कम मिळालेली नाही त्यांना लवकरच बोनसची रक्कम मिळणार. तसेच रबी हंगाम २०२०-२१ मध्ये खरेदी केलेल्या धानाचे  चुकारे करण्यासाठी गोंदिया जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या कडे १३४.७६ कोटी व भंडारा जिला मार्केटिंग अधिकारी यांच्याकडे ४२.८९ कोटी ची रक्कम वर्ग १८ जून रोजी करण्यात आलेली आहे. बोनसची निधी उपलब्ध करुन दिल्या बद्दल जिल्हयातील धान उत्पादक शेतकर्यानी खा. पटेल यांचे आभार मानले आहे.