
विदर्भ वतन / चंद्रपुर : चीन कडून भारतीय जवानांवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या विरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. चीन निर्मित कोरोनाच्या संकटाचा भारतासह जगातील सर्वच देश सामना करत आहे. अशावेळी चीन भारतीय सीमारेषेवर तणाव निर्माण करू पाहत आहे या घटनेविरोधात आम आदमी पक्षाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्याकडून गाव, तालुका, जिल्हा व शहर पातळीवर राज्यभर “आक्रोश प्रदर्शन” करण्यात आले.
आपल्या वीर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पित करण्यात येवून चीन विरोधात निषेध म्हणून आक्रोश व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुनिल देवराव मुसळे, संतोष दोरखंडे, भिवराज सोनी, राजु कुडे, दिलीप तेलंग, मयूर राईकवार, सुनील भोयर, योगेश आपटे, प्रशान्त एरने, देवकी देशकर, राजेश चेड़गुलवार, शंकर धुमाळे, राजू कूड़े, विशाल भाले, रामदास पोटे, राशिद शेख, मुजफर खान, अमजद शेख, मीणा शेगोकर, सुभाष शेगोकर , अशोक आनंदे , अजय डुकरे तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

