रागाच्या भारात स्वत:च्या घराला लावली आग

300

आगीत घर जळून खाक लाखोचे नुकसान

राधाकिसन चुटे, जिल्हा प्रतिनिधी गोंदिया

विदर्भ वतन / गोंदिया : जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात कौटुंबिक वादावरून स्वत:च्या घराला आग लावल्याची घटना गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत रामाटोला येथे घडली. या घटनेतील दोन भावांची कुटुंब उघड्यावर आले असुन या घटनेत अन्नधान्य, दागिने, रोकड, कागदपत्रे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तु जळून खाक झाले आहे. घटनेची तक्रार धनलाल रहांगडाले यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात केली. गोरेगाव तालुक्यातील रामाटोला येथील धनलाल रहांगडाले यांच्या मुलगा व्यंकट रहांगडाले यानी घरातील सदस्यांसोबत वाद घातला. या वादाच्या भीतीने व्यंकटचे वडील धनलाल रहांगडाले त्याचा लहान भाऊ आणि पत्नीसह इतर नातेवाईकांकडे गावाबाहेर गेले. दरम्यान व्यंकट याने रागाच्या भरत घराला आग लावली. स्फोट होऊ नये म्हणून आग लावण्यापूर्वी व्यंकटने गॅस सिलेंडर घराबांहेर काढुन ठेवले. हा प्रकार जेव्हा ग्रामस्थांच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत याची माहिती कुटुंबियांना दिली. तो पर्यंत पुर्ण घर जळुन खाक झाले होते. घर जळाल्याने आत ठेवलेली रोकड, अन्नधान्य, दागिने, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तु जळून खाक झाले. यात लाखो रुपयाचा नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पावसाळा सुरु झाल्याने आता या परिवाराला राहायला घर नसल्याने उघडयावर राहण्याची समस्या निर्माण झाली आहे. धनलाल रंगडाले यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात व्यंकट रहांगडाले याच्याविरूध्द तक्रार दाखल केली.