Home Breaking News आमदार मोहन मते यांनी ऐकल्या नागरिकांच्या समस्या

आमदार मोहन मते यांनी ऐकल्या नागरिकांच्या समस्या

191 views
0
विदर्भ वतन / नागपूर : दक्षिण नागपुरचे आमदार मोहन मते यांनी दक्षिण नागपूरातील मानेवाडा परिसराचा दौरा केला. दरम्यान त्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकूण घेतल्या. अध्यापक नगर, महाकाली नगर, लक्ष्मण नगर, शारदा चौक, आकाशनगर, शेषनगर, जानकीनगर, शिवशक्ती नगर आदी भागातील नागरिकांनी आपल्या समस्या आमदारांपूढे ठेवल्या. यावेळी त्यांनी पावसाळापूर्व अतिआवश्यक कामांची पाहणी केली. दरम्यान हनुमान नगर झोन क्र. ३ चे अधिकारी उपस्थित होते.
 नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे यांनी आ. मते यांच्यापुढे प्रभागातील नागरिकांच्या वतीने निवेदन व तक्रारी ठेवल्या. गंभीर समस्या असलेल्या जागांची आमदारांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. अतिआवश्यक कामाचे प्रस्ताव तयार करणे व मंजुरी घेऊन समस्या सोडविण्याच्या सूचना आमदारांनी अधिकार्यांना दिल्या. यावेळी संजय ठाकरे, सुनील मानेकर, नानाभाऊ आदेवार, बाबाराव तायडे, अजय वाघ, प्रदीप मोहाडीकर, मंगेश ठाकुर, सचिन महल्ले, भूषण टीक्कस, रितेश पांडे आकाश भेदे तसेच प्रभागातील नागरिकांची उपस्थिती होती.