Home Breaking News सभापती भारती पाटील यांनी घेतला शिक्षण विभागाचा आढावा 

सभापती भारती पाटील यांनी घेतला शिक्षण विभागाचा आढावा 

0
सभापती भारती पाटील यांनी घेतला शिक्षण विभागाचा आढावा 
विदर्भ वतन / कामठी : नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समिती सभापती भारती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभाग पंचायत समिती कामठीची आढावा सभा कामठी पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आली. या सभेत कामठी पं. स. सभापती उमेश रडके, उपसभापती आशिष मल्लेवार, जिल्हा परिषद सदस्य अवंतिका लेकुरवाळे, ज्ञानेश्वरजी कंभाले, पं. स. सदस्य दिलीप वंजारी, पुनम मालोदे, दिशा चनकापुरे, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी(प्राथ.) चिंतामण वंजारी, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी प्रामुख्याने उपस्थित होते. आढावा सभेची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आली. आढावा सभेचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथ.), चिंतामण वंजारी यांनी केले. कामठी तालुक्याचा आढावा गट शिक्षणाधिकारी कश्यप सावरकर यांनी सादर केला.
आढावा सभेमध्ये केंद्र प्रमुख, विषय साधन व्यक्ती, विशेष तज्ञ, फिरते विशेष शिक्षक यांनी आपण केलेल्या गुणवत्ते संबंधी कार्याचा आढावा सादर केला.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती भारती पाटील यांनी काम करतांना विद्यार्थ्यांची गुणवत्ता लक्षात घेवून त्यासाठी कृती कार्यक्रमाचे नियोजन करून त्यानुसार कार्य केले तर गुणवत्ता निश्चितच वाढेल. पर्यवेक्षिय यंत्रणेने पुढील शैक्षणिक सत्राकरिता योग्य नियोजन करून गुणवत्तेत वाढ करावी. कार्यक्रमाला शिक्षण विभाग अधीक्षक अनिल पवार, केंद्र प्रमुख किसमल माकडे, राजेंद्र डोर्लिकर, मंगला हिंगंणघाटे, प्रशांत येवले, कनिष्ठ अभियंता समग्र शिक्षा विवेक जयस्वाल, विषय साधनव्यक्ती कांबळे, ठाकरे, नागदेवे, शालिनी कुंजरकर विशेष साधन व्यक्ती शुभांगी ठाकरे, डाटा एन्ट्री आॅपरेटर चौबे, रोखपाल समर्थ, फिरते विशेष शिक्षक मानकर, भिवगडे, मेहर, अहिरकर, डांगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन साधनव्यक्ती ज्योत्स्ना मासरकर यांनी तर आभार प्रदर्शन शा.पो.आ. अधिक्षक किरण चिनकुरे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here