प्रधानमंत्री आवास योजनेचा हप्ता केंद्राने तत्काळ द्यावा

188

कॉंग्रेस सरचिटणीस सुरेश भोयर यांची मागणी

विदर्भ वतन / कामठी : नगरपरिषदेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनें नुसार ६८८ घरकुल मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी कामठी नगर परिषेतील ३५५ घरकुलांचे बांधकाम करणे सुरू असल्यामुळे योजनेतील राज्य शासनाकडून दिला जाणार निधी मिळाला आहे पण केंद्र शासनाकडून प्राप्त होणार निधी अद्याप मिळाला नसल्यामुळे भरपावसाळ्यात या घरकुलांची कामे अर्ध्यावर थांबलेली आहेत. हा निधी तत्काळ देण्यात यावा अशी मागणी कॉंग्रेसचे सरचिटणीस सुरेश भोयर यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदनातून केली.
२०२०  पर्यंत सर्व बेघर कुटूंबांना घर देण्यासाठी केंद्र शासनाने ‘प्रधानमंत्री आवास योजने’चा आरंभ मोठ्या गाजावाजा केला होता. त्याला ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेने भरभरून प्रतिसाद दिला. योजना राबविण्यासाठी संबंधीत राज्यांनी आपला त्यात वाटा द्यायचा होता. तो वाटा कामठीतील लाभधारकांना मिळाला मात्र, केंद्र शासनाकडून मिळणारा निधी मिळालाच नसल्याने अनेकांनी आपली घरे अर्ध्यावरच सोडली असून निधी मिळण्याच्या प्रतिक्षेत कार्यालयात खेटा मारने सुरू आहे. पावसाळा सुरू झाला आहे. घराचे काम पूर्ण व्हावे या विवंचनेत मिळेल तिथून व्याजाने पैसे घेऊन शक्य होईल तेवढे बांधकाम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला पण रक्कम अपूरी पडल्याने केंद्राकडून मिळणार्या रकमेकडे या लाभार्थ्यांच्या नजरा लागल्या आहेत.