Home Breaking News मानकापुर उडानपुलावर वाढल्या दुर्घटना

मानकापुर उडानपुलावर वाढल्या दुर्घटना

67 views
0

 पुलाचे बांधकाम नित्कृष्ठ दर्जाचे

विदर्भ वतन / नागपूर : सदर येथील मानकापुर उडान पुलाचे बांधकाम पुर्ण झाल्याला वर्षही उलटले नाही त्यात आता पर्यंत अर्धा डझन दुर्घटना झाल्यामुळे या पुलाच्या बांधकामाचा दर्जा नित्कृष्ठ असल्याचे या घटनांवरून सामोर आले आहे. पुलाच्या उद्घाटनाला जेवढे महिने झाले नसतील तेवढ्या दुर्घटना येथे होत आहेत.
महिन्याला एक तरी वाहन दुर्घटनेचा बळी ठरत आहे.
सोमवार दिनांक १५ जून रोजी गोकुळ फ्राईट कॅरियरच्या दुधाच्या वाहनाचे चाक स्लीप झाल्यामुळे हे वाहन दुर्घटनाग्रस्त झाले. वाहनाची गती कमी होती पण पुलावरून गाडी चालतांना शर्फेसवर टायरची ग्रीप मिळाली नसल्याने आणि पावसाचे पाणी साचत असल्याने गाडीची चाके देखील स्लीप होतात असे गाडीचालक म्हणाला. सामोर विधान सभेची निवडणूक होती त्यामुळे पुलाचे काम लवकर व्हावे या घाईमुळे होईल तसे काम करण्यात आले. या कारणांमुळे या कामातील बारकाव्याने अनेक कामे शिल्लक राहिली असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.