Home Breaking News मका रस्त्यावर फेकून केले आंदोलन

मका रस्त्यावर फेकून केले आंदोलन

161 views
0

विदर्भ वतन / अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील पांढरवाणी आदिवासी विविध सेवा सहकारी संस्थेच्या हद्दीतील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर मक्याची लागवड केली. यावर्षी केंद्र सरकारने राज्य सरकार मार्फत आधारभूत किमतीवर मका खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश पारित केले आहेत.
आदिवासी सेवा सहकारी क्षेत्रातील मका हा प्रादेशिक व्यवस्थापक आदिवासी विभाग यांनी करावा अशा सूचना राज्य शासनाने दिले परंतु परिसरातील मका उत्पादक शेतकरी वारंवार उपप्रादेशिक कार्यालय नवेगाव बांधच्या चकरा मारत होते तरी सुद्धा मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये पावसाळा सुरुवात झालेला आहे म्हणजे या हंगामाच्या लागवडीसाठी पैशाची आवश्यकता भासत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होताना दिसून येत आहे.
या धोरणाविरोधात शेतकर्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. दिनांक १५ जूनला उपप्रादेशिक कार्यालय नवेगावबांध येथे निवेदनाद्वारे सूचना देऊन शेतकर्यांनी १६ जूनला मक्याची खरेदी झाली नाही तर १७ जून पासून नवेगाव बांध उपप्रादेशिक कार्यालयासमोर संपूर्ण मका आणून आंदोलन करण्याचा इशारा मका उत्पादक शेतकर्यांनी दिला होता. यावर प्रशासनाकडून कुठलेही प्रतिसाद न मिळाल्याने दिनांक १७ रोजी सकाळी ११ वाजता उप प्रादेशिक कार्यालय लगत नवेगांव -अर्जुनी मार्गावर मका रस्त्यावर फेकून शेतकर्यांनी आंदोलन केले. तहसीलदार विनोद मेश्राम, उप प्रादेसीक अधिकारी पाटील, थानेदार दिनकर ठोसरे, जिल्हा परिषदेचे गटनेते गंगाधर परसुरामकर, जिल्हा परिषदेचे सदस्य किशोर तरोणे, राष्ट्रवादी कार्यकर्ते यशवंत गणवीर व शेतकरी उपस्थित होते.