Home Breaking News राहुल गांधींच्या वाढदिवशी कोरोना योध्यांचा सत्कार

राहुल गांधींच्या वाढदिवशी कोरोना योध्यांचा सत्कार

128 views
0
विदर्भ वतन / आमगाव : दिनांक १९ जून रोजी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा वाढदिवस. या दिवसाचे औचित्य साधून तालुका काँग्रेस कमिटी आमगावच्या वतीने देशांमध्ये कोरोना सारख्या भीषण परिस्थितीशी झुंज देत देशाची सेवा करणार्या कोरोना योध्यांचा सत्कार करून गरजू रुग्णांना फळ व मास्क वितरण करण्यात आले.
तालुक्यातील कोविड-१९ केअर सेंटर येथे अहोरात्र सेवा पुरविणारे डॉक्टर अरविंद खोब्रागडे, डॉ. एस. एम. भुस्कुटे, प्राचार्य भवभूती महाविद्यालय आमगाव, डॉ. गायधने व संपूर्ण आरोग्य सेवा देणारी चमू तसेच सर्व सहकार्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांना प्रोत्साहित करून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र बनगाव येथे रुग्णांना फळ वितरण करण्यात आले. यासाठी अहोरात्र कष्ट करणारे पोलीस विभागांचे पोलिस उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकूल तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक शामराव काळे आणि संपुर्ण चमूचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, तालुका महिला काँग्रेस कमिटी, सेवादल, युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.