
माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वात शुभारंभ
विदर्भ वतन / अर्जुनी मोरगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात असलेल्या भाजपा सरकारने दुसर्या कार्यकालातील वर्षपुर्ती निमित्त भाजप तालुका अर्जुनी मोर तर्फे आयोजित संपर्क अभियानाचा शुभारंभ आज १८ जुन रोजी ईटखेडा, नवनितपुर , सिरोली, माहुरकुडा येथुन माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वात करण्यात आला.
बडोले यांनी मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती देत पत्रके वितरण केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाहितासाठी अनेक योजना अंमलात आणल्या. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात पुन्हा सरकार स्थापन झाल्यानंतर मोदी सरकारने जम्मू-काश्मिरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवले. त्याच बरोबर जम्मू-काश्मिर आणि लडाख असे दोन केंद्र शासित प्रदेश तयार करण्यात आले. मोदी सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांपैकी हा महत्वपूर्ण निर्णय असल्याचे सांगितले. अयोध्येत प्रभु श्रीरामचंद्रांच्या मंदिराचे निर्माण करण्याचे भारतवासीयाचे स्वप्न पुर्ण झाले आहे, नागरिकता संशोधन कायदा लागु झाला, आर्थिक सुधारणांना गती देण्यात आली, भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी मोदींनी राष्ट्रव्यापी हाती घेतले, कोरोना महामारीच्या जागतिक संकटाचा सामना करताना आपल्या ओजस्वी कामगीरीने जगाला दिशा दाखविण्याचे काम नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात भारताने केले आहे तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, किसान पेन्शन योजना, मोफत विज कनेक्शन, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेतर्गत मोफत कनेक्शन अशा विविध योजनाच्या माध्यमातुन सर्व घटकाना दिलासा देणारे निर्णय मोदी सरकाराने घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अर्जुनी मोर भाजप तालुका अध्यक्ष तथा पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर, भाजप प्रदेश सदस्य रचना गहाणे, जिल्हा महामंत्री लायकराम भेंडारकर, उमाकांत ढेंगे, रघुनाथ लांजेवार, रामदास कोहाटकर, मुरलीधर ठाकरे, रामलाल मुंगणकर, होमराज पुस्तोडे, नुतन सोनवाने, व्यंकट खोब्रागडे, रमेश मस्के, प्रदिप मस्के, अश्विन कोडापे, रामु केशरवानी, गोपाल शेंडे, गुलाब लंजे, त्र्यंबक बेहरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थितीत होते.

