Home Breaking News शेतकरी सुलभ पिककर्जाचा आढावा

शेतकरी सुलभ पिककर्जाचा आढावा

0
शेतकरी सुलभ पिककर्जाचा आढावा

आमदार सहसराम कोरोटे यांची उपस्थिती

विदर्भ वतन / आमगाव : तहसील कार्यालय आमगाव येथे आमदार सहसराम कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली ‘शेतकरी सुलभ पिककर्ज’ या विषयावर आढावा सभा घेण्यात आली. सदर सभेमध्ये तहसीलदार दयाराम भोयर, तालुक्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी व राष्ट्रीयकृत बँकेचे व्यवस्थापक, तालुका सहायक निबंधक सहकारी संस्था, तालुका कृषी अधिकारी जाधव, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय बहेकार,  शहराध्यक्ष आमगाव अजय खेतान, इंजि. तारेन्द्र रामटेके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रसंगी सदर विषयावर सविस्तर चर्चा करून आमदारांनी संबंधित शासकीय यंत्रणेला शेतकरी हा कुठल्याही परिस्थितीमध्ये पीककजार्पासून वंचित राहता कामा नये यासाठी सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीयकृत बँक यांच्या व्यवस्थापकांनी युद्धपातळीवर पीक कर्जाचे लक्षांक गाठावे, शेतकर्यांना सन्मानपूर्वक वागणूक देऊन अत्यंत सुलभ पद्धतीने पिककर्जाचा लाभ देण्यात यावा, पिककर्ज पुरवणार्या सर्व सहकारी सोसायट्यांकडून पात्र शेतकर्यांना कर्जापासून वंचीत ठेवू नये,  तालुका कृषी अधिकारी यांना पिकविम्याबाबत विशेष जनजागृती करून नैसर्गिक आपदामुळे बाधित झालेल्या नुकसानभरपाईला पिकविम्याच्या माध्यमातून शाश्वत भरपाई  मिळवून द्यावी, राष्ट्रीयकृत बँकांच्या व्यवस्थापकांना ग्रामीण भागात विशेष करून महिला बचतगट, छोटे-मोठे लघु, कुटिर उद्योग, बेरोजगार युवकांना शासनाच्या कर्ज योजनेचा लाभ देऊन ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्यासंदर्भात उपाययोजना करण्यात याव्या असे निर्देश दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here