Home Breaking News गणेश मंदिर टेकडी संस्थेत अध्यक्षांची मनमानी

गणेश मंदिर टेकडी संस्थेत अध्यक्षांची मनमानी

105 views
0

सचिव संजय जोगळेकर यांचा आरोप

विदर्भ वतन / नागपूर : शहराचे मानबिंदू असलेले गणेश टेकडी मंदिराला सध्या ट्रस्टचे अध्यक्ष लखीचंद यांच्या मनमानीचे ग्रहण लागल्याने ट्रस्टमधील अन्य पदाधिकार्यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीत दिल्यानुसार लखीचंद हे गणेश मंदीराचे कामकाज आपल्या मर्जीप्रमाणे करतात, मंदीराची तोडफोड करतात यासंदर्भात ट्रस्टचे सचिव संजय जोगळेकर यांनी धर्मदाय आयुक्त आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचीका दाखल केली. यावर हिट व्हेंटीलेशन न तोडण्याचा आदेश न्यायालयाने दिला.  एवढ्यावरच अध्यक्ष थांबले नाही तर कोरोना काळात त्यांनी मिटींग सुध्दा बोलाविली. आवश्यक गणपुर्ती नसताना देखील काही प्रस्ताव पारीत करून घेतले आणि त्यानुसार अमलबजावणी सुध्दा सुरू केली. यावर आम्ही धर्मदाय आयुक्तांना कळविले की, ट्रस्टमधील बहुतेक सदस्य सत्तरीतील आहेत आणि सध्या कोरोनाचा संक्रमण काळ आहे. हे बेकायदेशीर असून यावेळी पारीत केलेले ठरावाला आमची सहमती नाही.
विद्यमान अध्यक्ष हे लावलेल्या मुर्ती आणि त्याच्यावर झालेल्या खर्चाचा भुर्दंड समितीवर लादण्याचा प्रयत्न करत आहेत. गणेश मुर्तीची जागा बदलविल्यामुळे भाविकांना सुध्दा गैरसोय होईल. तेव्हा या बेलगाम अध्यक्षांनाच्या कुकृत्याला आळा घालावा अशी तक्रार पोलिसात देण्यात आली असल्याचे संजय जोगळेकर, श्रीराम कुळकर्णी, विकास लिमये आणि हरि भालेराव यांनी माध्यमांना सांगीतले.