
मुख्याधिकार्यांना वर्क आॅर्डर देण्यात इतकी आवड का?
नगर वासीयांचा आरोप
विदर्भ वतन / अर्जुनी मोर: नगर पंचायत अंतर्गत विविध कामांसाठी २ करोड मंजूर झाले असता आपल्या हिस्स्याचे काम व कामाचा नफा मिळावा याकरिता नगर सेवकांकडून अनेक कामांचे वर्क आॅर्डर थांबवून ठेवले होते.
परंतु नगरातील कामे लांबणीवर जाऊ नये या उद्देशाने मुख्याधिकारी शिल्पाराणी जाधव यांनी त्वरित वर्क आॅर्डर काढून कामाची मंजुरी दिली. मंजुरी दिल्याने संबंधित कामे कंत्राटदाराकडे गेले, यामुळे नगर सेवकांना मिळणारा नफा मात्र हुकला. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या आदेशाच्या विरोधात नगर पंचायतमध्ये चांगलेच वादविवाद रंगले आणि संतापलेल्या नगर सेवकांनी कार्यालयीन वेळेत दिनांक १६ जुनला साय. ५.४५ वाजता प्रत्यक्ष अकाऊंटट यांच्या आलमारी सह बांधकाम व लेखा विभागाच्या कक्षातील शटर पाडून त्याला कुलूप लावून नगर पंचायत शिपाई रेवचंद रणदिवे यांना धमकी देवून चावी हिसकावून घेतली.
कार्यालयीन वेळेत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या संदर्भात मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी गोंदिया, जिल्हा प्रशासनाधिकारी, नपाप्र, गोंदिया, उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोर यांना प्रतिलीपीसह ठाणेदार यांच्याकडे नगर सेवक प्रकाश तुकाराम शहारे, नगर सेविका पौर्णिमा कृष्णा शहारे, वंदना मंनसाराम शाहरे, वंदना युवराज जांभूळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी लेखी तक्रार केली.

