गोंदियात पुन्हा नवे १५ कोरोना बाधित रुग्ण

216

एकूण संख्या १०१ वर

विदर्भ वतन / गोंदिया (जिमाका) : जगातील काही देश आज कोरोना विषाणू प्रादुभार्वाच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे जगभर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अलीकडे जिल्ह्यात देखील दररोज आढळून येणार्या बाधित रुग्णांमुळे चिंता वाढली आहे. आज (दिनांक १६) पुन्हा नवीन १५ रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात एकूण बधितांची संख्या १०१ इतकी झाली आहे. जिल्ह्यात आता ३२ क्रियाशील रुग्ण आहेत.
सहा दिवसापूर्वी कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आखाती देशात रोजगारासाठी गेलेले जिल्ह्यातील लोक परत जिल्ह्यात येत असल्यामुळे हे लोक चाचणी अहवालावरून कोरोना संसर्ग बाधित असल्याचे दिसून येत आहेत. १६ जून रोजी गोंदिया येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून प्राप्त चाचणी अहवालातून सलग पाचव्या दिवशी देखील रुग्ण आढळून आले आहे. तब्बल १५ रुग्ण कोरोना बाधित असल्याचे अहवालावरून दिसून आले आहे. पाच दिवसात ३२ रुग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येकाने कोरोनाची बाधा होणार नाही यासाठी योग्य काळजी घेण्यात यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.
जिल्ह्यात आता कोरोना क्रियाशील रुग्णांची संख्या ३२ झाली आहे. आज जे १५ रुग्ण आढळून आले आहे. त्यामध्ये तिरोडा तालुक्यातील १३ रुग्ण आणि गोंदिया तालुक्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात मागील पाच दिवसात आढळून आलेल्या बाधित व्यक्ती या आखाती देशातून जिल्ह्यात दाखल होताच त्यांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले. त्यामुळे त्यांचा संपर्क जिल्ह्यात बाहेर इतरांशी न आल्यामुळे इतर कोणीही त्यांच्यामुळे बाधित झालेले नाहीत. आता आढळून आलेले १३ रुग्ण हे तिरोडा तालुक्यातील आहे. ते आखाती देशातून जिल्ह्यात आले आहेत. दोन रुग्ण हे गोंदिया तालुक्यातील आहे. ते रुग्ण दिल्ली येथून आले आहेत. पाच दिवसांपूर्वीच दुसर्यांदा कोरोनामुक्त झालेला गोंदिया जिल्ह्यातील आखाती देशात रोजगारासाठी गेलेले जिल्ह्यातील लोकं परत जिल्ह्यात आले आहेत.

कोरोना बाधित आढळून आलेले १०१ रुग्ण हे तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. अर्जुनी मोरगाव तालुका – ३१, सडक/अजुर्नी तालुका – १०, गोरेगाव तालुका – ४, आमगाव तालुका -१, सालेकसा तालुका – २, गोंदिया तालुका – २२ आणि तिरोडा तालुका – ३१ रुग्ण आहेत.

जिल्ह्यातील १३६८ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यामध्ये १०१ रुग्ण कोरोना बाधित आढळले. अद्याप ३९ नमुन्यांचा चाचणी अहवाल गोंदिया येथील विषाणू प्रयोगशाळेत प्रलंबित आहेत.