विदर्भ वतन / नागपूर : पोलिसांची कोरोना पासून रक्षण व्हावे यासाठी त्यांची इम्युनीटी पॉवर वाढवण्यास मदत करणारी आयुर्वेदिक वटी आणि काढा चेतना जागृती फाउंडेशनच्या वतीने वाटप करण्यात आला. फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना जाधव आणि डॉ. अर्चना कान्होलकर यांच्या समूहाने हा काढा तयार करून पोलिस तपासणी शिबिरामार्फत मोफत वाटण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत सक्करदार व बेलतरोडी या दोन पोलिस स्टेशनमध्ये औषधे वाटप करण्यात आली.
शिबीरात ३५० पोलिसांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. शिबाराच्या यशस्वीतेसाठी सीताबर्डी पो.स्टे. चे पोलिस निरिक्षक राजपूत व पोलिस निरीक्षक सत्यवान माने (सक्करदार पोलीस स्टेशन) यांच्या सहकार्याने तसेच सकरदार व बेलतरोडी पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक विजय अकोटकर याच्या पोलिस अधिकार्यांनी योगदान दिले. फाऊंडेशनच्या अध्यक्षांनी सर्व सहभागी व सर्व सभासदांचे आभार मानले. या शिबीरात अनिल जाधव, पियुष बजाज, डॉ. अर्चना कान्होलकर, पूजा सिंह, डॉ. प्रगत वजिरे, डॉ. दिपाली बागडकर आणि प्रणय खोब्रागडे यांनी मोलाचे योगदान दिले.

