Home Breaking News जिल्हा सिमा बंद असतांना अवैध दारु चंद्रपूरात दाखल होतेच कशी?

जिल्हा सिमा बंद असतांना अवैध दारु चंद्रपूरात दाखल होतेच कशी?

233 views
0

आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित केला प्रश्न

 अवैध दारुच्या वाढत्या विक्रिवर आ. जोरगेवार यांनी घेतली पोलिस अधिक्षकांची भेटअवैध दारु विक्री बंद करण्याचे निर्देश

चंद्रपूर –       कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हात दाखल होणा-या सिमा बंद करण्यात आल्या आहे. अशात नागरिकांना जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी पासेस चि गरज आहे. हे पास काढतांनाही चांगलीच दमछाट करावी लागत आहे. मात्र हा नियम दारु तस्करांसाठी नसल्याचेच दिसून येत आहे. जिल्हा दाखल होणा-या पॉइंट वरती पोलिस बंदोबस्त असतांना जिल्हात अवैध दारु दाखल होतेच कशी असा प्रश्न आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित केला असून अवैध दारु विक्रीवर पूर्णतः  आळा घालण्याचे निर्देश पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांना दिले आहे. आज आमदार किशोर जोरगेवार यांनी अवैध दारुविक्रीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधिक्षकांची भेट घेतली असून या बाबत चर्चा केली.
चंद्रपूरात दारुबंदी असली तरी त्याची पूर्णताह अमलंबजावनी करण्यात प्रशासनाला आजवर तरी यश आलेले नाही. मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात दारु विक्रीचे प्रमाण कमी झाले. दारुचा तुटवडा असल्याने दुप्पट तीप्पट किमतीत दारु विकल्या गेली. मात्र आता पून्हा अवैध दारुची वाहतूक मोठया प्रमाणात सूरु झाली आहे. या दारु विक्रर्त्यांना कोणाचेही भय नसल्याचे दिसून येत असून चंद्रपूरात स-हासपणे दारु विकल्या जात आहे. दारु विक्रीसाठी दारु तस्करांना एरिया वाटप करण्यात आल्याच्याही चर्चा आहे. हा प्रकार अतिशय गंभिर असून नागरिकांची चिंता वाढविणारा आहे. असे आ. किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांची भेट घेवून अवैध दारु विक्रीवर प्रतिबंध घालण्याबाबत चर्चा केली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सध्या चंद्रपूरात सुरु असलेल्या अैवध दारु व्रिकी बाबत नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यात प्रवेश करणा-या सिमेवर पोलिस बंदोबस्त तैणात करण्यात करण्यात आला आहे. येथील पोलिस कर्मचा-यांकडून येथून येणा-या प्रत्येक वाहणांची तपासणी केल्या जाते एकादयाकडे पोलिस विभागाची परवाणगी नसल्यास त्याला सिमेवरच थांबविल्या जात. असा पोलिसांचा दावा आहे. मात्र हा नियम दारु तस्करांसाठी नाही का असा प्रश्नही यावेळी  आ. जोरगेवार यांनी केला. चंद्रपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी पोलिसांनी दारु विरोधी कारवायाही केल्या आहे. या कारवायांमध्ये दारुसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र हि दारु जिल्हात आली कशी याचा शोध पोलिस प्रशासनाने घेत हि दारु चंद्रपूरात दाखल करण्यासाठी मदत करणा-यां वरही कारवाई करावी अशा सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्यात. दारुच्या व्यवसायात गुंड प्रवृत्तीचे लोक गुंतले असल्याने नागरिकांमध्ये भिती आहे. असे असतांनाही दारु विक्रीबाबत नागरिक पोलिसांना वेळो वेळी माहिती देत असतात. मात्र आता नागरिकांनी पोलिसांना दारु तस्करांबाबत दिलेली माहितीही लिक होत असल्याचे प्रकार घडत आहे. त्यामुळे पोलिस विभागातील काहींचे दारु तस्करांसोबत मधूर संबध आहेत का अशी शंका उपस्थित होत आहे. याकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. संचारबंदी असतांनाही चंद्रपूरात आलेला अवैध दारुचा महापूर पोलिस प्रशासनाच्या कामावर प्रश्न उपस्थित करणारा असल्याच्या चर्चा रंगत आहे. दारु विक्रर्त्यांची यादी पोलिसांकडे आहे. सध्या सक्रिय दारुविक्रेर्त्यांबाबत पोलिसांना माहिती आहे. असे असातांनाही कारवाई होत नसल्याने नागरिकांध्ये पोलिस प्रशासनाच्या भुमीकेवर शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे आता दारु विक्रीच्या व्यवसायात गुंतलेल्यांवर कारवाई करत अवैध दारुविक्री पूर्णतः बंद करा असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिले आहे.