
नवी दिल्ली, 14 जून 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशांत सिंग राजपूत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान म्हणाले, “सुशांत सिंग राजपूत … एक प्रतिभावान तरूण अभिनेत्याला खूप लवकर मृत्युला सामोरे जावे लागले. त्यांनी दूरचित्रवाणीवरील मालिका आणि चित्रपटांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. मनोरंजनाच्या जगात त्यांच्या उदयाने अनेकांना प्रेरणा मिळाली . त्यांच्या कित्येक संस्मरणीय भूमिका कायम लक्षात राहतील. त्यांच्या निधनाने धक्का बसला. त्यांचे कुटुंब आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांति”

