
दंड सुध्दा आकारण्यात आले
विदर्भ वतन / नागपूर : लॉकडाऊनमुळे गत अडीच महिन्यांपासून सर्वांचे व्यवसाय ठप्प पडलेले आहेत. त्यामुळे पोटापाण्याची चिंता व्यापारी वर्गाला सुध्दा भेडसावत आहे. अशात काही अंशी लॉकडाऊन शिथील करण्यात आल्यामुळे आवश्यक खर्चापुरती सुध्दा मिळकत काही व्यापार्यांना होत नाही. नियमाला अधिन राहून दुकाने सुरू करू देण्यात आली असली तरी नियमाचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाईचे प्रावधान आहे.
यात कळीचा मुद्दा असा आहे की, प्रशासनाकडून नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी योग्य पध्दतीने आपले कर्तव्य बजावत असल्याचे दिसून येत नाही. उलट हे कर्मचारी आपल्या अधिकाराचा दुरूपयोग करत असल्याचे दिसून येते. अशीच एक घटना झिंगाबाई टाकळी येथील मोनू मोबाईल रिपेअरिंग या दुकानदारांसोबत घडली. या दुकानावर कर्मचार्यांनी ‘आॅड इन इवन’चा गुन्हा दाखवून पाचशे रूपयाचा दंड आकारला. ही कारवाई ८ जून रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान करण्यात आली. पण दंड आकारण्यात आलेली पावती कर्मचार्यांनी ७ जूनची दिली. जर गुन्हा ८ तारखेला घडला तर दंडाची पावती ७ तारखेची कशी असा प्रश्न दुकानदारांनी उपस्थित केला. शिवाय ‘आॅड इन इवेन’ च्या निर्देशानुसार ८ जून हाच दिवस आमचे दुकान सुरू करण्याचा होता. ७ जूनला तर आमचे दुकानच बंद होते.
आलेल्या मनपा कर्मचार्यांनी आपल्या सोबत अभद्र व्यवहार केला आणि शिवीगाळ सुध्दा केली असा अरोप मोनू बसंतवानी यांनी केला आहे. तर अनलॉकच्या नंतर शोशल डिस्टसिंगच्या नावावर पोलिस व मनपा प्रशासन विनाकारण आम्हाला त्रास देत असल्याचे झिंगाबाई टाकळी या परिसरातील व्यापार्यांनी सांगीतले. लॉकडाऊनमुळे आर्थीक परिस्थिती कोलमडल्यामुळे मोजकेच ग्राहक दुकानात येत असल्याची खंत देखील येथील व्यापार्यांनी व्यक्त केली.

