Home Breaking News अर्जुनी मोर ‘अनलॉक’

अर्जुनी मोर ‘अनलॉक’

126 views
0

विदर्भ वतन / अर्जुनी मोर : दिनांक २५ मे रोजी अर्जुनी नगरातील बरडटोली येथे कोरोना विषाणु संक्रमित एक रुग्ण आढळून आला त्यानंतर स्थानीय नगर प्रशासन तर्फे सम्पूर्ण नगराला कंटेन्मेंट झोन सह बफर झोनमध्ये परिवर्तित करण्यात आले होते. परंतु संक्रमित झालेला रुग्ण बरा होऊन घरी परतला आणि बंद झालेल्या सम्पूर्ण बाजारपेठांबद्दल व्यापारी वर्गात व नगरवासीयांमध्ये बाजारपेठ पूर्ववत सुरु होण्यासंदर्भात संभ्रम निर्माण झाला होता.
आज दिनांक ८ जुनला स्थानीय नगर पंचायत येथे व्यापारी सिस्ट मंडल आणि नगर प्रशासन यांच्यामध्ये सभा आयोजित करण्यात आली. सभेत नगरातील दुकाने मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार या दिवसीच सकाळी ९ ते सांयकाळी ५ वाजेपर्यन्त पान टपरी, चहा दुकाने, सलून वगळता सर्व दुकाने सुरु राहणार तसेच शनिवार,रविवार,सोमवारला सम्पूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजीपाला विक्रेत्याना एका ठिकाणी बसून भाजीपाला विकता येणार नाही. तर त्यांना निश्चित करुण दिलेल्या परिसरात फिरते पथक पद्धतीनेच भाजीपाला विकावा लागणार असल्याचे निश्चीत करण्यात आले आहे. आज झालेल्या निर्णयाचा सम्पूर्ण व्यापारी तसेच ग्रहकांना काटेकोरपने पालन करावे लागणार आहे. नियमाचे उल्लंघन झाल्यास नगर प्रशासन आर्थिक दंडात्मक कार्यवाईसह दुकान ‘सील’ सुध्दा केल्या जाऊ शकते. कुठल्याही नियमाचे उल्लघन होणार नाही आणि सुव्यवस्था टिकून ठेवण्याची विनंती नगराध्यक्ष तथा नगर पंचायत मुख्याधिकारी यांनी सर्व नगरवासियांना केली.