Home नागपूर रमेश इलेक्ट्रीकल आणि सखी इलेक्ट्रीकलची एसआयटी मार्फत चौकशी करा

रमेश इलेक्ट्रीकल आणि सखी इलेक्ट्रीकलची एसआयटी मार्फत चौकशी करा

0
रमेश इलेक्ट्रीकल आणि सखी इलेक्ट्रीकलची एसआयटी मार्फत चौकशी करा

कॉंग्रेसचे सुरेश भोयर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

विदर्भ वतन / कामठी : शहरातील अंडर ग्राऊंड इलेक्ट्रीकल्स केबलची कामे रमेश इलेक्ट्रीकल प्रा. लिमी या कंपनीकडे देण्यात आली आहे. मागील दोन वर्षांपासून कामठी शहरात या कंपनीने शहरभर खड्डे खोदून ठेवले आणि केबल उघड्यावर असल्यामुळे पावसाळ्यात नागरिक किंवा जनावरांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची संभावना नाकारता येत नाही. या कंपनीने केलेल्या कामात देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून कामात वेळोवेळी अनियमितता दिसून आली आहे. त्यामुळे या दोन्ही कंपनीची चौकशी करून उर्वरित देयके थांबविण्यात यावी अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांचकडे महाराष्ट्र प्रदेश कॉंगे्रस कमिटीचे सरचिटणीस तथा जि.प. माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांनी केली.
सखी इलेक्ट्रीकल्स प्रा. लिमी. या कंपनीने कामठी आणि मौदा तालुक्यातील हॉयमास्ट लाईट लावण्याचे काम साधारणत: २० कोटी रूपयाचे या कंपनीने केले. नगरपरिषद कामठी अंतर्गत लावण्यात आलेले हायमास्ट लाईट लावण्यात आले. हे काम करताना कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात आले नाही.
या कामात भाजप कार्यकर्त्यांची मर्जी आणि सोयीनुसार सदर कंपनीने तत्परता दाखविली. एकंदरीतच निविदेप्रमाणे काम झाले नाही, उलट कामाचा दर्जा सुध्दा नित्कृष्ट होता. कमी दर्जाचे साहित्य वापरण्यात आले त्यामुळे यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनात येते असे, सुरेश भोयर यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करून उर्वरित देयके थांबवावी आणि कारवाई करण्याव यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here