नाभिक समाज ११ तारखेला करणार आंदोलन 

276

मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष

विदर्भ वतन / नागपूर : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे सलून व ब्युटी पार्लर व्यवसाय २३ मार्च पासून बंद आहेत. त्यामुळे नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. असे असले तरी नाभिक समाजाने शासनास सहकार्य करून आपले व्यवसाय आजपर्यंत बंद ठेवले आहे. नाभिक एकता मंचच्या वतीने शासनास मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील नाभिक एकता मंचच्या सर्व कार्यकारणीद्वारे निवेदन देऊन नाभिक सलून व्यवसायिकास मदत करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु शासनाने या निवेदनाची दखल घेतली नाही.
नाभिक एकता मंचच्या वतीने वारंवार पत्र देवून शासनास स्मरण करुन देण्यासाठी सुध्दा निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये शासनाने आमच्या मागणीचा विचार करून नाभिक सलून व्यवसायिकांना व्यवसाय सुरु करण्याची परवानगी व आर्थिक मदत सुद्धा आजपर्यंत केली नाहीं. म्हणून  ११ जून रोजी संपुर्ण राज्यभर नाभिक एकता मंचच्या वतीने नाभिक समाज आपल्या व्यवसाय स्थळी मूक आंदोलन करतील. या वेळी जर काही अप्रिय घटना घडल्यास त्याची संपूर्ण जवाबदारी शासनावर राहील असे नाभिक एकता मंचच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.