वेब सिरिज भारतीय युवकांना पथभ्रष्ट करण्याचा डाव ?

198
विदर्भ वतन / नागपूर :  अश्लीलता तसेच हिंसक दृष्ये यांचा मारा करणार्या वेब सिरिजना भारतात गेल्या दोन वर्षांत उधाण आले आहे. नैतिक मूल्यांचा र्हास करण्यासह अनेक वेब सिरिजमधून भारतीय सैनिकांविषयी गलिच्छ दृष्य दाखवण्यात आली आहेत. इंटरनेट क्रांती झाल्यापासून भारतात स्वस्त आणि वेगवान इंटरनेट सर्व्हिस उपलब्ध झाली. ओव्हर द टॉप (ओटीटी) स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून सामाजिक, नैतिक आणि राष्ट्रीय मूल्यांना पायदळी तुडवले जात आहेत. या माध्यमांवर कोणत्या प्रकारची दृष्ये दाखवली जावीत, याला कोणतेही बंधन नाही की, त्यावर कोणाचे नियंत्रण सुध्दा नाही. वेब सिरिजच्या माध्यमातून चाललेला धुडगूस वेळीच रोखला नाही, तर प्रेक्षकांचे मोठया प्रमाणात सांस्कृतिक आणि राष्ट्रीय अध:पतन होईल. हे होऊ द्यायचे नसेल, तर वेब सिरिजवर सेन्सॉरशिप आणणे, आवश्यक आहे. असे सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस यांनी प्रसिध्दी पत्रकातुन म्हटले.
वेब सिरिजतील दृष्य चितावणीखोर असे, अल्ट बालाजीवर प्रसारित केल्या जाणार्या एकता कपूर यांच्या २ या वेब सिरिजच्या माध्यमातून भारतीय सैनिकांचा अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अवमान केला आहे. भारतीय सैन्याधिकारी कर्तव्य बजावण्यासाठी सीमेवर गेल्यावर त्याची पत्नी तिच्या प्रियकराला घरी बोलवून अनैतिक संबंध प्रस्थापित करते. तिच्या प्रियकराला सैनिकाचा गणवेष घालायला लावते आणि ती फाडते, असे घृणास्पद दृष्य या वेब सिरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. अनुष्का शर्माने बनवलेल्या पाताल लोक या ह्यवेब सिरिजमध्ये हिंदु धमार्ला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले आहे.
आत्मनिर्भरतेपुढचा अडथळा
        काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिला होता. हे सूत्र केवळ आर्थिक विषयांशी निगडित नाही, तर त्याला सांस्कृतिक पदरही आहे. संस्कृती आणि राष्ट्रभक्ती हा आत्मनिर्भरतेचा पाया आहे. वेब सीरिजच्या माध्यमातून तो डळमळीत होत आहे. त्यामुळे आत्मनिर्भरतेपुढे अडथळा ठरणार्या वेब सीरिज आणि आॅनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर सरकारने निर्बंध घालावेत, ही अपेक्षा देखील चेतन राजहंस यांनी व्यक्त केली.