केशोरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

277

विदर्भ वतन / अर्जुनी मोर : कोरोना विषाणुच्या प्रादुभार्वाने संपूर्ण संचार बंदीच्या आवाहनानंतर राज्यात तसेच सम्पूर्ण देशात अनेक समस्या निर्माण झाल्यात. त्यामधे कोरोना संक्रमनाच्या व्यतिरिक्त इतर आजाराचे रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात भरती असताना खुप मोठ्या प्रमाणात रक्ताचा तूटवटा निर्माण झाला  महाराष्ट्रात रक्ताचा तुटवटा होत असताना शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धब ठाकरे व युवासेना प्रमुख महाराष्ट्राचे केबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्येक शिवसैनिकाला आपल्या शाखेमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्या करिता आवाहन केलेत. त्या आवाहनाला प्रतिसाद देत तालुका शिवसेना अर्जुनी मोरच्या सौजन्याने शिवसेना शाखा केशोरी स्थित ग्रामीण रुग्णालयात लोकमान्य ब्लड बँक गोंदियाच्या माध्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे अयोजन करण्यात
आले.सामाजिक अंतर व योग्य स्वच्छता आणि संचार बंदीच्या सम्पूर्ण नियमाचे पालन करीत तब्बल ४३ लोकांनी शिबिरात रक्तदान केले. या प्रसंगी शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष शैलेश जायसवाल, जिल्हा सचिव संजयसिंह पवार, तालुका प्रमुख अजय पालिवाल, तालुका संघटक चेतन दहिकर, युवासेना जिल्हा प्रमुख अश्विनसिंह गौतम, युवासेना तालुका अधिकारी अभिजित मसीद, कापगते, सुशील गहाने, नाना शेंडे, सुधाकर बोरकर, भारत गहाने, विलाश दर्रे, बगाजी वलथरे, राजेन्द्र ऊके आदींची उपस्थिती होती.