तुषार देवढे यांची आवाहन
विदर्भ वतन / वर्धा : खरीप हंगामासाठी पीक कर्ज घेण्याकरिता शेतकर्यांची संबंधित कार्यालयांमध्ये गर्दी वाढत आहे. शिवाय बँक जुन्याच नियमांच्या व कागदपत्रांच्या आधारे पीक कर्जाचे कागदपत्रे भरून घेत आहेत. लॉकडाऊनमुळे त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणाहून कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी गर्दी होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे पीक कर्जाची पध्दत आणखी सोप्या पध्दतीने करावी अशी मागणी चर्धा शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुषार देवढे यांनी केली.
यासाठी लागणार्या कागदपत्रांमधील एक दस्तावेज म्हणजे स्टॅम्प. हा स्टँम्प केवळ तालुक्याच्या ठिकाणी मिळत असल्यामुळे फक्त एवढ्यासाठी तालुक्याच्या गावी येरझार्या माराव्या लागत आहे. स्टॅम्प बँकतूनचन उपलब्ध व्हावा याकडे त्यांनी प्रामुख्याने लक्ष वेधले. सोबतच शेतकर्यांच्या बांधावर खते, डीएपी, बी-बीयाणे उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केली.

