Home नागपूर तुषार देवढे यांनी राबविले ‘जनता रोटी’ अभियान

तुषार देवढे यांनी राबविले ‘जनता रोटी’ अभियान

67 views
0

विदर्भ वतन / वर्धा : लॉकडाऊनमुळे फेरीवाल्यांसह अन्य अतिसामान्य नागरिकांची हेळसांड झाली आहे. त्यांनाही जगता यावे, ते उपवाशी मरू नये यासाठी चर्धा शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुषार देवढे यांनी ‘जनता रोटी’ हा उपक्रम राबविला. यामाध्यमातून दररोज पंनासहून अधिक लोकांना पोटभर भोजन दिल्या जात आहे. निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा याप्रमाणे हे अभियान राबविले जात आहे. याशिवाय जोडीला राज्य शासनातील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेतर्फे राज्यात ‘शिवभोजन’ हा उपक्रम सुरू आहेच. या उपक्रमासाठी व्यापरी सदस्य बाबु सोनी, युवा शिवसैनिक गणेश पांडे, इरफान बेग, हरितवाल हे परिश्रम घेत आहेत.