
शिवसेना उपजिल्हा प्रमुखांचा प्रशासनाला इशारा
विदर्भ वतन / वर्धा : देशात कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू असताना हातावर पोट असलेल्या मजुरांना कसे जीवंत ठेवता येईल याकडे सर्व सामाजीक संस्था आणि प्रशासन दिवसरात्र धावपळ करत आहे. मात्र, याचा गैरफायदा घेत काही रेती तस्करांनी रेती घाटातील रेतीची अवैद्य तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू केली असुन या प्रकाराला तत्काळ आळा घातला नाही तर आम्ही स्वत: रेती घाटावर जावुन याला आळा घालू असा इशारा शिवसेना उपजिल्हा प्रमुख तुषार देवढे यांनी प्रशासनाला दिला आहे.
गत दोन वर्षांपासून महसूल विभाग रेतीघाटाचा लिलाव करण्यासाठी चालढकल करत आहे आणि तिकडे प्रशासनाचा महसूल बुडवून बिनधास्तपणे रेती उपसा सुरू आहे असे असूनही प्रशासनातर्फे अद्याप एकावरही कारवाई झाली नाही त्यामुळे यात अप्रत्यरित्या प्रशासनातील काही कर्मचारी-अधिकार्यांचा त्यांचेवर वरदहस्त तर नाही ना ? असा संशय येतो. जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, देवळी, पुलगाव, आष्टी आणि सेलू येथे रेतीतस्कर अतिसक्रीय झाले आहेत. संबंधित प्रशासनाला जाग आली नाही तर शिवसेना स्टाईलने आम्ही ‘ते’ करून दाखवू असा इशारा देवढे यांनी दिला.

