Home गोंदिया माझ्या मुलाचा आकस्मिक मृत्यू नसून संगनमताने केला खून 

माझ्या मुलाचा आकस्मिक मृत्यू नसून संगनमताने केला खून 

0

वडील सुभाष डोंगरवार यांची गुन्हा दाखल करण्याची मागणी

संतोष रोकडे
विदर्भ वतन / अर्जुनी मोर : गुरूवार दिनांक २ एप्रिल रोजी चिचगड पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद असलेल्या विशाल सुभाष डोंगरवार (रा. झाशीनगर, तालुका अर्जुनी मोर) याचा आकस्मिक मृत्यू नसून, त्याच्या पाच मित्रांनी संगनमताने केलेला खून असल्याचा आरोप मृतकाचे वडील सुभाष डोंगरवार यांनी केला असून या संशयीतांना पकडून सखोल तपास करून खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.
याबाबत आपण दिनांक १८ एप्रिल रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी यांना तसेच चिचगड पोलीस स्टेशनला  तक्रार दिली असल्याची माहिती डोंगरवार यांनी दिली आहे. मात्र, दीड महिन्याचा कालावधी लोटूनही पोलिसांनी कुठलीच चौकशी केली नाही. पोलिस आपल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सुभाष डोंगरवार यांनी केला आहे.
दिनांक २ एप्रिलला मृतक विशालचा मित्र नेतराम वाढई याने आपल्या स्वत:च्या घरची भांडे नेऊन माझ्या मुलाला मोबाईल संदेशाद्वारे बोलावून झाशीनगर पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या इटियाडोह धरणाच्या परिसरात नेले. त्या ठिकाणी मृतकाच्या मित्रांनी पार्टी केली आणि आपल्या मुलाला पाण्यात बुडवून जीवे मारले. असे सुभाष डोंगरवार यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी व जिल्हा पोलीस अधिक्षक गोंदिया यांना दिलेल्या लेखी तक्रारीतून केला आहे. मुलाचा खून केलेल्या आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी सुभाष डोंगरवार यांनी केली. यात सहभागी असलेले अन्य मित्रांपैकी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोदरा येथे तीन, येरंडी देवलगाव येथील एक व झाशीनगर येथे एक असे पाच जण राहत असल्याचे डोंगरवार यांनी सांगितले. मृतक विशाल याचा झाशीनगर येथील नेतराम याच्याशी घटनेच्या एक आठवडाआधी भांडण झाले होते. घटनास्थळावर मृतक विशाल याचे शरीरावरील कपडे अस्ताव्यस्त फेकले होते. मोबाईल फोन एरोप्लेन मोड वर टाकण्यात आला होता. मोबाईल मधील फोटो डिलीट केलेली होती नेत्रा मेला मृतक विशाल च्या मोबाईल चे पूर्ण पासवर्ड माहित होते. असा क्रम आणि अन्य संशयास्पद बाबी सुध्दा तक्रारीत नोंदविण्यात आला आहे.
 मी स्वत: झाशीनगर येथील तंटामुक्त समिती अध्यक्ष आहे. मला जर न्यायासाठी एवढा विलंब लागत असेल, पोलीस विभाग जर माझ्या तक्रारीची दखल घेत नसेल, मुलाच्या खुनाच्या तपासाचे चक्र वेगात फिरत नसतील तर या गोष्टीचे आपल्याला आश्चर्य वाटते. पोलीस अधिक्षक गोंदिया यांनी मला न्यायालयात जाऊन पुन्हा पोस्टमार्टम करण्याचा आदेश आणण्याचा सल्ला दिला आहे.
सुभाष डोंगरवार, झाशीनगर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here