बचत गटला दिलेल्या कर्जाची वसुलीवर अतिरीक्त व्याज घेणे थांबवा

170
विदर्भ वतन / नागपूर : लॉकडाऊनमुळे सर्वांनाच आर्थीक फटका बसला. कर्ज घेतलेल्यांसाठी आॅगस्टपर्यंत त्याचे हप्ते भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे मात्र, महिला बचत गटांनी घेतलेल्या कर्जाची वसुली धुमधडाक्यात सुरू असून त्यावर अतिरिक्त व्याज घेणे देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
महिलांनी गटाच्या माध्यमातून कर्ज घेतले होते. त्या संस्था किंवा त्यांच्याकडून पाठविलेले एजंट जबरन कर्ज वसुली करत आहे. वारंवार महिलांना कर्जवसुलीकरिता त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याच्या प्रयत्न केल्या जात आहे तसेच मागील लॉकडाऊन काळात जे हफ्ते सुटले असतील त्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात व्याज वसूलने सुरू आहे. यामुळे या सर्व महिलांवर आर्थिक संकट कोसळले. रिजर्व बँक आॅफ इंडिया यांनी जाहीर केलेल्या सूचनेनुसार कुठल्याही प्रकारची कर्जवसुली ही आॅगस्ट महिन्यानंतर घेण्यात यावी. या सुचनेचे पालन सुद्धा करताना खाजगी वित्त संस्था करतांना दिसत नाही. या जाचाला कंटाळून जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यावेळी शेख अयाज भाई (माजी अध्यक्ष) पुर्व नागपूर ब्लॉक कॉग्रेस,  कृपेश मेश्राम (अध्यक्ष, पूर्व नागपूर मानव अधिकार सेल काँग्रेस) व देशराज पाटील (उपाध्यक्ष, पूर्व नागपूर मानव अधिकार सेल काँग्रेस) उपस्थीत होते.