Home गोंदिया नाभिक समाजाने केले आंदोलन

नाभिक समाजाने केले आंदोलन

194 views
0

सुरेश चन्ने, प्रतिनिधी
विदर्भ वतन / देवरी ( जि. गोंदिया ) : नाभिक समाज आधीपासूनच आर्थिक दृष्ट्या मागास आहे. परंतु कोरोनाच्या नावावर शासनाकडून वारंवार सलून दुकान बंद ठेवल्या जात असल्यामुळे हा दुकानदार गत अडीच महिंन्यापासून आर्थिक संकटात सापडलेला आहे. नाभिक समाजाने दिनांक ६ जून रोज शनिवारला महाराष्ट्रभर आंदोलन केले होते. गोंदिया जिल्ह्यातील सलून दुकानदारांनीसुध्दा आपल्या बंद दुकानांसामोर तोंडाला काळा मास्क लावून आणि हातावर फलक घेऊन आंदोलन करून आर्थिक मदतीसाठी शासनाच्या धोरणाचा निषेध करत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.
नाभिकांना सलुन दुकाने सुरू करू देण्यात यावे, दुकान मालकांना १० हजार आणि कारागिरांना पाच हजार रूपये मदत देण्यात यावी, दुकानाचे, घराचे भाडे आणि वीज बिल माफ करण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
येत्या १० जून पर्यंत नाभिक समाजाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार शासनाने न केल्यास, नाभिक समाजाकडून जेलभरो आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती गोंदिया जिल्हा नाभिक समाज संघटनेचे सचिव सुरेश चन्ने यांनी दिली.