एसआरपीएफ गोळीबार प्रशिक्षणादरम्यान झाडलेल्या गोळीने गर्भवती जखमी  

214
 राधाकिसन चुटे, जिल्हा प्रतिनिधी 
विदर्भ वतन /गोंदिया : एसआरपीएफ जवानांच्या प्रशिक्षणादरम्यान फायरिंगचे प्रशिक्षण सुरू असताना अचानक सुटलेली गोळी गर्भवती महिलेला लागल्याने ती गंभीर जखमी झाली. हि घटना आमगाव तालुक्यातील चिरचाळबांध गावाजवळील डोंगरगाव घडली. येथे नागपुरातील एसआरपीएफ जवानांचे गोळीबार प्रशिक्षण सुरू होते.
 सितेपार या गावातील वर्षा पटले ही महिला गर्भवती असुन स्वत:च्या घरी आगंणात कपडे वाळवित होती. हवेत सुटलेली बंदुकीची गोळी त्या महिलेच्या पायात  शिरली तात्काळ त्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर तीला घरी सोडण्यात आली.  यापुर्वी डिसेंबर २०१९ मध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती. हे विशेष. असा प्रकार होत असल्याने या प्रशिक्षण केंद्राला इतर ठिकाणी हलविण्यात यावे किंवा गावात अशा प्रकारे घटना होऊ नये यासाठी शासनाने सुरक्षेचे उपाय शोधावे अशी मागणी सीतेपार व परिसरातील नागरिकांनी केली आहे.