सीमेवर तणाव वाढला, चिनची आक्रमक 

284
विदर्भ वतन / नागपूर (वृत्तसंस्था) :
लडाख लगत असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर चीनने भारताविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे सध्या सीमेवर तणावाचे वातारण निर्माण झाले आहे. भारत व चीनचे सैन्य समोरासमोर उभे ठाकले आहेत. यापुर्वी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झटापटही झाली असून त्यात काही सैनिक जखमी झाले आहे. दोन्ही बाजूंच्या सैनिकांनी संरक्षणासाठी बंकर बांधले आहेत. तसेच अतिरिक्त सैन्याची जमवाजम करण्यात आली आहे. या सीमेवर गस्म घालणार्या भारतीय जवानांना चिनी सैनिकांनी अडविले होते. चीनच्या हद्दीत आम्ही कधीही घुसखोरी केलेली नाही, असे भारताने स्पष्ट केले आहे. २०१७ साली डोकलाम येथे भारत व चीनचे सैन्य संघर्षाच्या पवित्र्यात सुमारे तीन महिने परस्परांसमोर उभे ठाकले होते. सध्या उद्भवलेल्या स्थितीसाठी सीमातंटा सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्याची तयारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्म्प यांनी दाखविली होती. कोरोनाची साथ जगभर पसरण्यास चीनच कारणीभूत असून या साथीचा विषाणू वुहानर येथील प्रयोगशाळेत बनविण्यात आला होता असा आरोप अमेरिकेने केला होता. तो चीनने फेटाळून लावला. भारतासोबतच्या सीमातंट्यात चीन करीत असलेल्या हडेलहप्पीबद्दल अमेरिकेने आता त्या देशाला पुन्हा सुनावले आहे. या दोन देशातील तणाव वाढत आहे.
डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते एंगेल म्हणाले की, शेजारी देशांशी असलेले मतभेद आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार सोडविण्याऐवजी चीन त्यांना धमकावत आहे. या वृत्तीचे दर्शन चीनने याआधीही घडविले होते. बळाचा वापर करून आपल्याला हवे ते साध्य करण्याचा चीनचा हेतू आहे. मात्र, जगातील सर्व देशांसह भारतही काही कायद्यांना बांधील आहेत. त्यांचे पालन करूनच प्रश्न सोडवायला हवे.