Home नागपूर विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ

विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ

113 views
0
वडधामना शिवारातील घटना
विलास माडेकर, विदर्भ वतन /वाडी :
स्थानिक वाडी पोलिस स्टेशन हद्दीत येणार्या डिफेन्सच्या परिसरातील विहिरीत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. ही आत्महत्या की हत्या याचा उलगडा होऊ शकला नाही. ही घटना सोमवारी उघडकीस आली. मृतकाची ओळख अद्याप पटली नसल्याने त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली, हे समजू शकले नाही.
प्राप्त माहितीनुसार, कंट्रोल रुममधून वाडी पोलिस स्टेशनला दुपारी ३ वाजता माहिती मिळाली की, ग्रेट लाईफ फॅमिली रेस्टॉरेंटजवळ, टीसीआय गोडाऊन शेजारी असलेल्या रक्षा मंत्रालयाच्या जागेत असलेल्या विहिरीमध्ये मृतदेह आहे. या माहितीच्या आधारावर वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पाठक, उपनिरीक्षक चोपडे, हवालदार राजेंद्र बोराडे यांनी घटनास्थळ गाठले. तेथे इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला. विहिरीत कुठलीही सुरक्षा जाळी किंवा पाण्यात
उतरण्यासाठी कुठलेही साहित्य नसल्याने वाडी नगर परिषदेच्या अग्निशमन चमूला
बोलावण्यात आले. मृतदेह सडल्याने तो काढण्यास अनेक अडचणी आल्या मात्र, पाच तासाच्या परिश्रमानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.