Home नागपूर चेतना जागृती फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

चेतना जागृती फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

141 views
0

पारडी ठाण्यातील पोलिसांची तपासणी
विदर्भ वतन / कामठी : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शहरात सुरक्षा व्यवस्था पार पाडत असलेल्या पोलिस कर्मचाºयांची स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे़ जनतेच्या बचावासाठी कर्तव्य पार पाडत असणाºया पोलिसांची चेतना जागृती फाउंडेशन व डॉ. अर्चना कान्होलकर यांच्या समुहाने दखल घेऊन त्यांचा ताब्येतीची तपासणी करून त्यांना इम्युनिटी पावर वाढविणारी आयुर्वेदिक वटी तयार करुन पारडी परिसरातील पोलिस ठाण्यात मोफत वाटप केले़
कोरोना या आजाराची देशाच्या रक्षकांना लागन होऊ नये याकरिता मोफत औषधी व काढा तयार करुन तो पोलिस दलात वाटप करण्यात आला. यावेळी किमान १०० पोलिसांची तपासणी करण्यात आली़. डॉ. अर्चना कान्होलकर व चेतना जागृती फाउंडेशनच्या समुहाने पोलिसांच्या या तपासणी शिबिराची सुरुवात पारडी पोलिस ठाण्यापासून केली़. प्रत्येक आठवड्यात वेगवेगळ्या पोलिस ठाण्याला भेट देऊन आयुर्वेदिक वटी, चूर्ण व त्यासोबतच काढासुध्दा वाटपाचे कार्य सुरु केले आहे. या अवघड परिस्थितीत पोलिसांच्या प्रकृतीची दखल घेत असल्याचे बघून पोलिस बंधुंनी उत्साहाने यात सहभाग घेतला तसेच चमुच्या या कार्याचे कौतुकही केले़ हा उपक्रम यशस्वी कोण्याकरिता चेतना जाधव, पियूष बजाज, अनिल जाधव, पुजा सिंग, डॉ. अर्चना कान्होलकर, प्रणय खोब्रागडे, पो.नि. सुनिल चौव्हान, डॉ. प्रगती वजीरे, डॉ. दिपाली बागडकर यांनी परिश्रम घेतले. हा कार्यक्रम सोशल डिस्टनसिंगच्या नियमानुसार पार पडला हे विशेष़