Home नागपूर नरखेड तालुक्यात दोघे कोरोना पॉझिटिव्ह

नरखेड तालुक्यात दोघे कोरोना पॉझिटिव्ह

139 views
0

घरच्यांची हलगर्जी भोवली

विदर्भ वतन / नरखेड : तालुक्यातील दोन युवकांचा कोरोना चाचणी अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली. हे दोघेही युवक नरखेड तालुक्यातील मन्नातखेडी या गावातील रहिवाशी आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिय प्रशासनाने गावपरिसर बंदी केली. हे दोघेही युवक रोजगारानिमित्त मुंबईला होते. लॉकडाऊनमुळे ते काही दिवसांपूर्वी गावात परतले. सुरक्षेचा उपाय म्हणून त्यांना गावात क्वारंटाईन ठेवण्यात आले. दरम्यान त्यांच्या स्त्रावाचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला. घरच्या मंडळींनी अहवाल येण्याची वाट न बघता त्यांना कोणालाही न जुमानता मुजोरीने घरी नेले. मात्र, घरी नेल्यावर सुध्दा त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करून घेतले नाही. बिनधास्तपणे गावात मुक्तपणे फिरण्यापर्यंत त्यांनी मजल मारली. परिणामी आज त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या व त्यांच्या घरच्यांच्या पायाखालची माती सरकली. या कालावधीत ते कोणाकोणाच्या संपर्कात आले होते त्यांचा शोध प्रशासनातर्फे घेणे सुरू आहे. तपासणीसाठी २८ जणाचे अहवाल नेण्यात आले होते त्यापैकी १४ जणांचे रिपोर्ट आले आहेत. यासंदर्भात आमचे प्रतिनिधी राहुल कान्होलकर यांनी मन्नातखेडीचे सरपंच अनिल बांद्रे यांचेशी संवाद साधला.
शासनाने सुरक्षेसंबंधी दिलेल्या निर्देशाचे पालन केले असते तर या दोन कोरोनाबाधितांच्या कुटुंबासह ते ज्यांच्या संपर्कात आले असावे त्यांचेवर आज ही वेळ आली नसती, अशा शब्दात परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.