Home गोंदिया शिवालया कन्स्ट्रक्शनला १ कोटी १० लाख ६४४०० रुपयाचा दंड

शिवालया कन्स्ट्रक्शनला १ कोटी १० लाख ६४४०० रुपयाचा दंड

0

अर्जुर्नी मोरगाव तहसीलदारांची कारवाई

संतोष रोकडे
विदर्भ वतन / अर्जुनी मोरगाव : लाखनी येथील शिवालया कंट्रक्शन कंपनीला  टीपीवरील वेळेत खोडतोड करून अवैध ४ ब्रास मुरुमाची वाहतूक केल्याप्रकरणी १ कोटी १० लाख ६४४०० रुपयाचा दंड तहसीलदार विनोद मेश्राम यांनी ठोठावला आले.
प्राप्त माहिती नुसार, शिवालया कन्ट्रक्शन कंपनीच्या वतीने अतुल सुधाकर डोर्लीकर रा. तालुका लाखणी, हल्ली मुक्काम नवेगावबांध तालुका अर्जुर्नी मोरगाव यांनी मौजा भुरसीटोला तहसिल साजा क्रमांक 03 येथील खाजगी जमीन गट क्रमांक ०६ आराजी ०.५० हेक्टर आर जागेमधून एक हजार ब्रास मुरूम उत्खनन करून वाहतूक करण्याचा परवानगी उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव यांच्या आदेशान्वये वाहतूक करण्यास परवाना काढण्यात आला आहे. अवैध  गौण खनिज तपासणी नायब तहसीलदार मुनेश्वर गेडाम हे करीत असताना, त्यांच्या जप्तीनाम्या नुसार शिवालया कंट्रक्शन कंपनीचे अतुल सुधाकर डोर्लीकर यांच्या मालकीचे टिप्पर क्रमांक ए एस, डी १, एफसी ९२६ मध्ये टिप्पर चालक लालदेव शिवालया कन्ट्रक्शन कंपनी कॅम्प नवेगाव बांध तालुका अजुर्नी मोरगाव यांनी दिनांक २४ मे २०२० रोजी सायंकाळी ४.५०  वाजता मौजा मुंगली येथे डीपीवर वेळेची खोडतोड करून ४  ब्रास मुरूम अवैधरित्या वाहतूक करताना आढळले. सदर वाहन जप्त करून तहसील कार्यालय अर्जुनी मोरगाव येथे ठेवण्यात आले आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ ७ अन्वये प्राप्त अधिकाराचा उपयोग करून महाराष्ट्र शासन राजपत्र क्रमांक १८ दिनांक १२ जानेवारी २०१८ नुसार कलम ४२ (७) अन्वये अवैधरित्या टिप्पर मधून  गौण खनिज वाहतूक केली, म्हणून अर्जुनी मोरगावचे तहसीलदार विनोद मेश्राम यांनी १ कोटी १० लाख ६४४०० रुपयाचा दंड ठोठावला आहे. डीपी व वेळेत खोडतोड करून व चार ब्रास मुरमाची अवैध वाहतूक केल्या प्रकरणी दंडाची रक्कम ठोठावली .  सदर दंडाची रक्कम शासन जमा करण्याचे शिवालया कंट्रक्शन कंपनीचे अतुल सुधाकर डोर्लीकर यांना २७ मे २०२० रोजी आदेशित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here