वेबीनार द्वारा महा सोलर संघटनेला गडकरीचे मार्गदर्शन

179
विदर्भ वतन / नागपूर : महा सोलर संघटनेच्या वतीने आयोजित वेबीनार मार्गदर्शत  एमएसएमई आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत सौर उर्जा क्षेत्रातील संधी समजून घेण्यासाठी आणि पोस्ट कोविड -१९ नंतरच्या आव्हाने आणि संधींबद्दल चर्चा करण्यासाठी वेबिनारची २३ मे रोजी महा सौर संघटनेच्या सदस्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वार बैठक घेण्यात आली.
त्यामध्ये पंचविस हजाराहून अधिक लोक उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सौर ऊर्जेचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले,  शेती, गोदाम इत्यादी क्षेत्र उर्जा विस्तृत क्षेत्र आहेत आणि सौर ऊर्जेचा योग्य व्यावसायिक वापर कमी करण्यास कारणीभूत ठरू शकते. भारत अजूनही ऊर्जा- कार्यक्षम सौर पॅनेल आयात करतो आणि “मेक इन इंडिया” उत्पादनांच्या मदतीने उत्पादकांना भारत स्वावलंबी बनविण्यासाठी प्रोत्साहित करते असेही ते म्हणाले. प्रतिनिधींच्या प्रश्नांना गडकरी यांनी उत्तर दिले. वेबिनारमध्ये सौर उद्योगातील अनेक प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. हितेश दोशी, सीएमडी, वेरी एनर्जीज लिमिटेड,  अविनाश हिरानंदानी, एमडी, न्युनीजिस, अंकित अग्रवाल, एमडी पॉलिकाब, अमित बर्वे, पॅनासॉनिक इंडियाचे प्रमुख  विनीत मित्तल, नवितास सोलर, अंकित गर्ग, एमडी सोलारियम यांच्यासह महा सौर संघटना संघाचे सदस्य, विपुल जोशर, प्रसन्ना सुथणे, प्रवीण चिकणकर, श्रीपाल खजांची, मयूर सोमाणी, जयदीप पटेल,  गिरीश दोहाणे, सौरभ डोकरे, अमोल शिरभाते यांची उपस्थिती होती. वेबिनारचे संचालन श्यामल चटर्जी, सचिव महा सौर संघटना यांनी केले तर राजा शेखरन, अध्यक्ष, महा सोलर संघठन यांनी आभार मानले