कोरोना पाठोपाठ टोळ किड्यांचे थैमान

228

राधाकिसन चुटे, जिल्हा प्रतिनिधी
विदर्भ वतन / गोंदिया : कोरोना पाटोपाठ आता टोळ किड्याने देशभर थैमान घातले आहे काल या टोळ किड्यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यात प्रवेश केला. कृषी विभागाने सतर्कता दाखवत पुर्वी फवारणी केली होती व काही प्रमाणात या किड्यांना मारण्यात यश आले होते, मात्र टोळधाड या किडीचे थवे करोडोच्या संख्येने असतात भंडारा जिल्ह्याला लागून मध्यप्रदेशची सीमा असल्याने आता टोळधाड हि मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात गेली आहे. या ठिकाणी शेतकर्यांनी लावलेला भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असल्याची माहिती शेतकर्यांनी बालाघाट येथील कृषी विभागाला दिली. त्यामुळे येथे सुध्दा अग्नी शमन विभागाच्या गाडीने फवारणी करण्यात आली. टोळधाड ज्या ठिकाणी आढळतात तेथे औषध फवारणी केली जात असून या टोळधाडीची संख्या कमी व्हावी करीत शासन प्रयत्न करीत आहे.