सिटूचा ५० वा स्थापना दिवस व सुवर्ण जयंती महोत्सव उत्साहात

232
आशा वर्कर्सनी केली मानव श्रृंखला
विदर्भ वतन / नागपूर : सी. आय. टी. यू. स्थापनेच्या निमित्ताने विविध ठिकाणी मागण्यांचे फलक घेऊन आशा वर्कर्स, गटप्रवर्तक व कंत्राटी कर्मचार्यांनी मानव श्रृंखला करून आणि आंदोलन करून वर्षगाठ साजरी केली. सिटूच्या स्थापनेला  आज पन्नास वर्षे झाली. सीटूची १९७० मध्ये कलकत्ता येथे स्थापना झाली होती. आंदोलनाचे नेतृत्व युनियनचे अध्यक्ष राजेंद्र साठे, महासचिव प्रीती मेश्राम व सचिव रंजना पौनिकर यांनी केले. कार्यक्रमात सोशल डीस्टसंच्या नियमाचे पालन करण्यात आले असून आशा, गटप्रवर्तक व कंत्राटी कामगारांना शासकीय कर्मचारी घोषित करा, समान काम -समान वेतन पद्धती लागू करा, एपीएल आणि बीपीएल अट रद्द करा, लॉकडाऊन दरम्यान सर्व कामगारांना किमान ७५०० रुपये महिना द्या. या मागण्याचे फलक घेऊन निदर्शने करण्यात आली.
संघर्ष केल्याशिवाय मार्ग नाही, पुंजिवादी सरकारला उलथून पाडण्याकरिता कामगारांनी सीटूच्या नेतृत्वात एकजुटीचा परिचय देऊन मोठ्या संघर्षाकरिता सदैव तयार राहण्याचे आवाहन अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने पौर्णिमा पाटील, अंजु चोपडे, रुपलता बोंबले, नासिर खान, अरुणा शेंडे, नंदा लिखार, लक्ष्मी कोटेजवार, मंजुषा फटींग, रिया रेवतकर इत्यादी कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील ४८ ठिकाणी कार्यक्रम घेऊन सीटूच्या झेंड्याला मानवंदना दिली.