क्वारंटाईन नागरिकांनी केला जि.प. शाळेचा कायापालट

250

विदर्भ वतन / अर्जुनी मोर : चौदा दिवस जिल्हा परिषदेच्या शाळेत क्वारंटाईन ठेवण्यात आलेल्या मजुरांनी या शाळा परिसराचा कायापालटच करून टाकला. या प्रकारामुळे जिल्ह्यात हा विषय चर्चेला आला आहे. कोरोनाच्या दहशतीत सापडलेल्या अर्जुनी मोर तालुक्यातील मजुर रोजगारासाठी इतर ठिकाणी गेले होते ते आता स्वगृही परतले असुन येणार्या प्रत्येक नागरीकावर ग्रामपंचायत व कोरोना दक्षता समितीची नजर असल्याने त्यांना घरी जावू न देता गावातील शाळेतच क्वारंटाईन करण्यात आले होते. तेथे डॉक्टरांच्या देखरेखीत त्यांना ठेवल्या जाते. चौवीस तास सारख बसून किंवा झोपून राहन अत्यंत कंटाळवान असल्यामुळे हा चौदा दिवसाचा वेळ वाया जावू नये म्हणून तालुक्यातील कुंभिटोला (बाराभाटी) येथे बाहेरुन आलेले तीन महिलांसह १४ लोकांनी जि. प. प्राथमिक शाळेत स्वच्छता मोहिम राबविली.
गावकरी सुध्दा या उपक्रमाला प्रतीसाद देत असल्याची माहिती कुंभिटोला येथील माजी सरपंच व शेतीनिष्ठ शेतकरी देवेंद्र राऊत यांनी दिली.