Home नागपूर लॉकडाऊनमुळे झाले १२ कोटी लोक बेरोजगार

लॉकडाऊनमुळे झाले १२ कोटी लोक बेरोजगार

65 views
0
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचा सर्व्हे
विदर्भ वतन / नागपूर : देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व उद्योग धंदे बंद ठेवण्यात आल्याने फक्त एकट्या एप्रिल महिन्यात देशभरात १२.२ कोटी लोक बेरोजगार झाले असल्याचे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संघटनेने सांगीतले आहे. बेरोजगार झालेल्यांमध्ये फेरीवाले, बांधकाम मजूर, रिक्षाचालक आदींचा प्रामुख्याने समावेश आहे. या संघटनेने यासंदर्भात नुकतीच पाहणी केली होती.
देशभरातील गरिबीचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या काही वर्षात केलेले सर्व प्रयत्न लॉकडाऊनच्या काही महिन्यामुळे फोल ठरणार आहेत. बेरोजगारीच्या प्रमाणात यावर्षी वाढच होईल. भारतात कोरोनाच्या संसर्गाने मरणार्यापेक्षा भुकेने मरणार्याची संख्या जास्त असेल, असे आयपीड ग्लोबल या संघटनेचे व्यवस्थापकीय संचालक अश्वजित सिंग म्हणाले.