Home नागपूर केरळमध्ये मान्सून १ जूनलाच

केरळमध्ये मान्सून १ जूनलाच

75 views
0

हवामान खात्याने दिली माहिती
विदर्भ वतन / नागपूर : यंदा मान्सूनचे आगमन ठरल्यानुसार १ जूनलाच होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. मान्सूनचे गुरूवारी बंगालच्या उपसागरात आणखी काही भागात आगमन झाले आहे. मालदीव, कोमोरीन क्षेत्रात आगमनाच्या दृष्टीने अनुकूल वातावरण होण्याची सध्यातरी शक्यता आहे. अरबी समुद्रातील पूर्व मध्य अरबी समुद्राच्या भागात ३१ मे ते ४ जूनदरम्यानर कमी दाबाचे क्षेत्र ४८ तासात तयार होण्याची चिन्हे आहे. ४ जूननंतर त्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊन ते दक्षिण ओमान आणि पूर्व येमन देशाच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. नेमकी हीच स्थिती मान्सूनच्या प्रवासाला पूरक ठरणार असल्यामुळे १ जूनला केरळात मान्सून धडकण्याची दाट शक्यता आहे. १ ते २ जूनला मान्सूनपूर्व पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात कोसळण्याची शक्यता आहे यात अल निनोचा प्रभाव पडण्याची चिन्हे नाहीत, मराठवाड्यात सर्वसामान्य, विदर्भात सामान्यापेक्षा कमी पाऊस होईल साधारणत: संपूर्ण महाराष्ट्रात ११ जूनला पाऊस येईल.